महाराष्ट्र
Trending

आधारकार्ड आणि मोबाईल परत देण्यासाठी मागितली एक हजाराची भुरटी लाच, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात !

नांदेड, दि. १ – महिलेच्या मीसिंग प्रकरणात तपासकामासाठी मोबाईल व आधारकार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले. मीसिंग महिला मिळूनही आली. मात्र, तक्रारदाराचा मोबाईल व आधारकार्ड परत देण्यासाठी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने एक हजार लाच मागितली. याप्रकरणी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले म्हणून नांदेडच्या विमानतळ पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक रामराव कुरूळेकर (वय ५३ वर्षे, व्यवसाय नौकरी, पद सहा. पोलीस उपनिरीक्षक नेमणुक पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड. रा. लक्ष्मीनारायण नगर, गेट नं गेट नं, तरोडा बु. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार हे त्यांच्या मित्राचे वाहनावर चालक म्हणून साधारण तीन महिन्यांपूर्वी नांदेड ते भोकर गेले होते. त्यांच्या मित्रासोबत एक महिला देखील होती. सदर महिला मिसींग असल्याबाबत पोलीस स्टेशन विमानतळ येथे तकार आली होती व सदरचा मिसींगचा तपास हा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक रामराव कुरूळेकर यांच्याकडे देण्यात आलेला होता.

या मिसींगच्या तपसात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक रामराव कुरूळेकर यांनी तक्रारदार यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेत त्यांचा मोबाईल व आधारकार्ड ताब्यात घेतले होते. काही दिवसानंतर ती महिला मिळून आली. त्यानंतर तक्रारदार हे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक रामराव कुरूळेकर यांना मागील तीन महिन्यांपासुन भेटून त्यांचा मोबाईल व आधारकार्ड परत द्या अशी विनंती करत होते.

तेव्हा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक रामराव कुरूळेकर यांनी मिसींग महीलेचा शोध घेण्यासाठी खुप खर्च झाला आहे, तुम्ही रू १,००० /- घेवून या आणि तुमचे आधारकार्ड व मोबाईल परत घेवून जा म्हणून पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड चे डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक यांच्या पर्यवेक्षणात जमीर नाईक, पोलीस निरीक्षक, गजानन बोडके, पोलीस निरीक्षक, नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक, पोना राजेश राठोड, पोशि अरशद खान, रितेश कुलथे, चा. पोना प्रकाश मामुलवार यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!