छत्रपती संभाजीनगर
Trending

नऊ तालुक्यांतील 46 ग्रामपंचायतीच्या 50 रिक्त पदांसाठी पोट निवडणूक; कामगारांना मतदानासाठी तीन तासाची सवलत !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. 17 -: राज्य निवडणूक आयोग यांनी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांतील 46 ग्रामपंचायतीच्या 50 रिक्त पदांच्या पोट निवडणूकी करीता गुरुवार दि.18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 वा.पासून ते सायं 5.30 वा. पर्यंत मतदान होणार आहे.

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क्‍ बजावण्यासाठी तीन तासाची सवलत देण्याचे आदेश कामगार उपायुक्तांनी दिले आहेत.

ही सवलत खासगी कंपन्या, आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शाँपीग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना लागु राहील.

Back to top button
error: Content is protected !!