वैजापूर
Trending

वैजापूर शहरात पोलिसांची धडक मोहीम, १६ वर्षांखालील ५ मुले मोटारसायकली चालवताना पकडले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – वैजापूर शहरात वाहतुक नियमन अनुषंगाने विशेष मोहिम राबवली. त्यात 16 वर्षांखालील पाच मुले मोटारसायकल चालविताना मिळून आले. त्यांच्या 05 मोटार सायकल डिटेन करून पोलीस स्टेशन वैजापूर येथे लावण्यात आल्या. या पाच मुलांच्या पालकांना पोलिस स्टेशनला बोलावून घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस स्टेशन वैजापूर हद्दीत वैजापूर शहरात 16 वर्षांखालील मुलांना मोटारसायकल चालवण्यास देऊ नका अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल असे आवाहन सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी, उपविभाग वैजापूर व पोलीस निरीक्षक संजय लोहकरे पोलीस ठाणे वैजापूर यांनी नागरिकांना व पालकांना या अगोदर वेळोवेळी केलेले आहे.

दिनांक- 15/02/2023 रोजी सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी, उपविभाग वैजापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरे सोबत ट्राफीक अंमलदार- पोका पैठणकर, पोकों कुल्हट, पोकों दिवेकर, पोकों बनगे यांनी वैजापूर शहरात वाहतुक नियमन अनुषंगाने विशेष मोहिम राबवली. त्यात 16 वर्षांखालील पाच मुले मोटारसायकल चालविताना मिळून आले. त्यांच्या 05 मोटार सायकल डिटेन करून पोलीस स्टेशन वैजापूर येथे लावण्यात आल्या. त्यानंतर महक स्वामी यांच्या व पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या समक्ष 16 वर्षांखालील मुलांच्या पालकांना पोलीस स्टेशन वैजापूर येथे बोलावून घेऊन मोटार वाहन कायदा अन्वये कायदेशीर दंड आकारण्यात आलेला आहे.

दंड आकारलेल्या नागरिकांना / पालकांना यापुढे आपल्या पाल्यांना मोटार सायकल अथवा चारचाकी वाहने चालविण्यास देऊ नयेत व आपण पालकच जर नियम मोडून आपल्या 16 वर्षाखालील पाल्यांना वाहन चालविण्यास देत असतील तर आपण त्यांच्यावर चुकीचे संस्कार करत आहात. प्रथम आपण स्वतः व त्यानंतर आपल्या पाल्यांना देखील वाहतुकीच्या नियमांचे पालण करण्याबाबत शिकवण दिली पाहिजे. यानंतर आपण 16 वर्षाखालील आपल्या पाल्यांना वाहन चालविण्यास दिले तर आपल्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी समज देऊन आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!