खुलताबादछत्रपती संभाजीनगर
Trending

खुलताबादच्या उमेद्वाराने छत्रपती संभाजीनगरात डमी परीक्षार्थी बसवला ! ATM ट्रान्समिटर, ब्लुटुथ डिव्हाईस, मख्खी एअर फोनसह पकडला गेला परंतू हातावर तुरी देवून पसार !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत गट क संवर्गातील संबंधीत परीक्षेला डमी विद्यार्थी बसला. परंतू परीक्षा केंद्रावरील सतर्क मॅनेजरमुळे पकडला गेला. ATM ट्रान्समिटर, ब्लुटुथ डिव्हाईस, मख्खी एअर फोनसह आधुनिक पद्धतीने तो कॉपी करत होता. मात्र, संशय आल्याने त्याला पकडले. विचारपूस करण्यासाठी त्याला परीक्षा हॉलच्या बाहेर घेवून आले असता तेथून तो हातावर तुरी देवून पसार झाला. त्यानंतर मूळ खूलताबादचा परीक्षार्थी आला. त्यानंतर त्याला पोलिस स्टेशनचा रस्ता दाखवण्यात आला असून पळून गेलेल्या डमी परीक्षार्थीचा शोध पोलिस घेत आहे.

वैभव पांडुरंग पवार पाटील (वय-32वर्ष व्यवसाय – टाटा कन्सलटन्सी सर्विसेस, आय ऑन डिजिटल झोन, MIDC सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते सुमारे आठ वर्षांपासून TCS आयऑन येथे डीव्ही मॅनेजर, म्हणून कार्यरत आहे. सदरचे श्री आयटी ऑनलाईन परीक्षा केंद्र ज्ञानपिठ कॅम्पस् II 3&4 फ्लोअर मध्ये, नारेगाव मेन रोड MIDC चिकलठाणाचे मालक विक्रम सिंग यादव असून टाटा कन्सलटन्सी सर्विसेस या कंपनीला सदरची बिल्डींग परीक्षासाठी भाडे तत्वावर देण्यात आली आहे.

सदर श्री आयटी ऑनलाईन परिक्षा केंद्र हे विविध प्रकारच्या (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय) गट क संवर्गातील संबंधीत परीक्षा घेतात. TCS अंतर्गत होणा-या सेंटर वर होणा-या सर्व परीक्षा मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील यांच्या देखरेखीखाली होतात. दि. 16/04/2023 रोजी सकाळी 08.30ते 10.00 च्या दरम्यान व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय गट क संवर्गातील सदर परीक्षार्थीचे हॉल टिकिट पाहून त्यांना 07.30 08.15 दरम्यान परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. सदर परीक्षेसाठी 142 परिक्षार्थी पैकी 127 परिक्षार्थी हजर होते. परीक्षेचा वेळ 08.30ते 10.00 अशी होती.

श्री आयटी ऑनलाईन परिक्षा केंद्र मध्ये मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील यांच्या कंपनीने नेमलेले मॉर्डन चे सेक्युरिटी गार्ड शुभम धायडे (वय 30 वर्ष रा. पिसादेवी जाधवाडी) व सेक्युरिटी गार्ड- 2 वैभव राजु सोनवणे (वय 21 वर्षे रा- वैशाली धाबा पिसादेवी रोड) यांनी सदर विद्यार्थ्यांना HHMD ने फिस्कींग करून वरच्या मजल्यावर पाठवले. पेपर चालु झाल्यानंतर तेथील केंद्रप्रमुख मनोज अंबाडे हे सदर परीक्षाहॉलमध्ये निरिक्षण करत असताना त्यांना एक परीक्षार्थी संशईतरित्या हालचाल करीत असल्याचे आढळून आला.

त्याची बारकाईने झडती घेतली असता त्याच्या जवळ 1 ) 4000/- रु किंमतीचे एक ATM ट्रान्समिटर ज्यामध्ये Airtel कंपनीचे सिम, ब्लुटुथ डिव्हाईस (2) MicSpyकंपनीचे काळ्या व पिवळ्या रंगाचे मख्खी एअर फोन 3) सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट 4) श्रीकांत सुखदेव केदरे यांचे मुळ आधारकार्ड, पॅनकार्ड असे एकुण 15000/- रुपये किंमतीचे साहित्य मिळून आले. सदर परीक्षार्थीचे हॉलटिकीट बारकाईने चेक केले असता, सदर हॉलटिकीटवरील फोटो आणी सदरचा व्यक्तीची चेहरा पट्टी वेगवेगळी दिसत असल्याने मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सदर परीक्षार्थीची चौकशी करणेसाठी त्यास हॉलबाहेर आणले असता, तो सदर ठिकाणावरून पळून गेला.

त्यामुळे त्याचे नाव, गाव व पत्ता समजु शकला नाही. त्यानंतर मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील व सहकार्यांनी पळून गेलेल्या विद्याथ्याच्या आसन क्र.50 ची पाहणी केली असता, सदर आसन क्र. केदारे श्रीकांत सुखदेव यांचा असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर काही वेळाने सदर ठिकाणी एक जण आसन क्र. 50 वर येवून बसला. त्यावेळी मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील व सहकार्यांनी त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव केदारे श्रीकांत सुखदेव (वय- 31 वर्षे रा- खुलताबाद) असे असल्याचे त्याने सांगितले.

त्यानंतर मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील व सहकार्यांनी पळून गेलेल्या  जवळ मिळालेले आधआर कार्डची पाहणी केली असता, ते केदारे श्रीकांत सुखदेव याचे असल्याचे दिसून आले. त्यानंतर श्रीकांत केदारे यास त्याचे ठीकाणी परीक्षेस बसलेल्या डमी परीक्षार्थीचे नाव विचारले असता त्यांने त्याचे नाव राहुल असे असल्याचे सांगितले. त्यानंतर  त्यास अधिक विचारपूस केली असता तो उडवाउडविचे उत्तरे देवू लागला. त्यानंतर मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील व सहाय्यक संचालक गणेश बाबुराव दंदे (वय 56 वर्षे रा- शहानुरवाडी) यांनी त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास गेले. सदर डमी परीक्षारार्थी यांना परीक्षा केंद्रावर मदत करणारे काही परीक्षा केद्रांचे कर्मचारी असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआईडीसी सिडको पोलिस स्टेशनमध्ये केदारे श्रीकांत सुखदेव (वय- 31 वर्षे रा- खुलताबाद) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या डमी परीक्षार्थीचा शोध पोलिस घेत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!