छत्रपती संभाजीनगर
Trending

वनसंरक्षक भरतीचा पेपर फुटल्याने खळबळ ! WhatsAppवरून 50 हजारांत उत्तरे पाठवणारा रंगेहात पकडला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १- वनसंरक्षक भरतीचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी छापा टाकून याचा पर्दाफाश केला. छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवराणा करीयर अकॅडमी, कलश हॉटेलच्या मागे, बजरंगनगर येथे हा प्रकार सुरु होता. व्हॉट्सअपवरून 50 हजारांत उत्तरे पाठवणार्यास रंगेहात पकडण्यात आले असून तीन जण पळून गेले. पोलिसांच्या हाती मोबाईल लागले असून या मोबाईलमध्ये 110 फोटो मध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य नागपूर वनभवन रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440009 असे लिहीलेले असून त्यावर प्रश्न दिसून येत आहे. पोलिसांनी छापा टाकताच तिघे पळून गेले मात्र, एक जण पोलिसांच्या गळाला लागला आहे.

सदर पकडलेला आरोपी विनोद प्रतापसिंग डोभाळ (वय 32 वर्शे, रा. दरेगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) याने तसेच इतर साथीदार यांनी संगनमताने मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य नागपूर वनभवन रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440009 या परिक्षेमध्ये एका उमेदवाराकडून प्रश्नपत्रीकेचे प्रश्न मोबाईलवर घेवून त्याची उत्तरे मोबाईल फोनव्दारे सांगून फसवणुक केली. सचिन गोमलाडू, लोधवाड, परीक्षेला बसलेला उमेदवार व तीन अनोळखींवर एमआईडीसी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोअं संतोश दादाराव गायकवाड (MIDC सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 31/07/2023 रोजी सांयकाळी 17.00 वाजेच्या सुमारास दोघांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, शिवराणा करीयर अकॅडमी, कलश हॉटेलच्या मागे, बजरंगनगर येथे वनरक्षक भरतीच्या उमेदवाराला फोनव्दारे माहिती देवून उत्तरे सांगत आहेत. सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना देवून त्यांच्या निर्देशानुसार सदर घटनास्थळावर छापेमारी करण्याचे ठरले. घटनेची सत्यता पडताळणीसाठी पोनि गौतम पातारे, पोउपनि जाधव, पोह संतोश सोनवणे, पोशि देविदास काळे, पोशि प्रकाश सोनवणे, पोना पठाण खाजगी वाहनाने सदर ठिकाणी रवाना झाले. सदर ठिकाणचा पंचनामा करणे असल्याने पोउपनि जाधव यांनी दोन पंचांना सोबत घेतले.

पोलिस पथक व पंच असे कलश हॉटेलजवळ थांबले. त्यानंतर पोअं संतोश गायकवाड व पोशि प्रकाश सोनवणे हे शिवराणा करीयर अकॅडमी येथे गेले. तेथे सदर अकॅडमीमध्ये सचिन गोमलाडु मिळून आला. त्यांना पोलिस म्हणाले की, आम्हालापण अकॅडमी जॉईन करायची आहे. त्यानंतर सदर अकॅडमीचे पोलिसांनी निरीक्षण केले असता त्यामध्ये 5 पुरुष हे बसलेले दिसले. सदरचे पुरुष हे फोनवर माहिती सांगत असल्याचे दिसून आले. सदरवेळी अकॅडमीमध्ये त्या पाच जणांना पोलिसांचा संशय आल्याने ते पळून जावू लागले. पोअं संतोश गायकवाड व पोशि प्रकाश सोनवणे या दोघांनी त्यातील एका जणास पकडले. पोअं संतोश गायकवाड यांनी तातडीने बाजुला थांबलेल्या पोलिस पथकाला इशारा केला. पथक पोहचण्यापूर्वी बाकीचे हे दोन पोलिसांच्या हाताला झटका देवून पळुन गेले.

सदर पकडलेला एक जण पळून जाण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याला पकडण्याच्यावेळी तो पडल्याने त्याला चेह-यावर मार लागला आहे. तसेच त्याला पकडताना त्याने विरोध केल्याने त्याचा शर्ट व बनियान फाटली आहे. तसेच पोअं संतोश गायकवाड यांच्या हाताला जखम झाली आहे. सदर पकडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव विनोद प्रतापसिंग डोभाळ (वय 32 वर्षे, रा. दरेगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्यास अकॅडमीमध्ये येण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, शिवराणा करीयर अकॅडमी संचालक सचिन गोमलाडु याने वनरक्षक दलाची परीक्षा देणा-या एका विद्यार्थ्याला आपल्याला त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो पाठविल्यावर त्यास उत्तरे पाठविणे आहे असे सांगितल्याने त्यास मदतीसाठी मी सदर अकॅडमीमध्ये आल्याचे त्याने सांगितले.

सदर व्यक्तीस इतर पुरुषांबाबत विचारणा केली असता त्याने त्यापैकी एकाचे नाव लोधवाड असल्याचे सांगितले. तसेच इतराबाबत माहिती नसल्याचे सांगितले. सदर व्यक्तीकडे मिळून आलेला मोबाईल फोन पंचासमक्ष तपासला असता फोनमध्ये व्हॉट्सअप चॅटमध्ये सचिन कारोळ उपसरपंच या नावाने संपर्क क्रमांक  यावरून दि. 31/07/2023 रोजीच्या तारखेत 111 फोटो (वेळ 16.47 वा. ते 17.30 वा., च्या दरम्यान) आलेले आहेत. ते फोटो उघडून पाहिले असता त्यावर 110 फोटो मध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य नागपूर वनभवन रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440009 असे लिहीलेले असून त्यावर प्रश्न दिसुन येत आहे. तसेच त्यावर रोल क्रमांक आहे. तसेच एका फोटोमध्ये पेनाने अनुक्रमांक टाकून त्यापुढे असलेल्या संख्येबाबत विचारणा केली असता विनोद प्रतापसिंग डोभाळ याने सांगितले की, ते आम्ही प्रश्नाची उत्तरे पाठविली आहे.

तसेच सदर पकडलेल्या विनोद प्रतापसिंग डोभाळ यास विचारले असता त्याने सांगितले की, शिवराणा करीयर अकॅडमीचे संचालक सचिन गोमलाडु यांनी वररक्षक परिक्षेच्या विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी मला तसेच इतर 4 जणांना त्याबदल्यात प्रत्येकाला 50,000 रु. देणार होते. त्यामुळे मी व इतर चे 4 जण आलो आहे. सोबत इतर असलेल्या इसमामध्ये एकाचे आडनाव लोधवाड असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर शिवराणा करीयर अकॅडमीची पाहणी केली असता तिथे 1) रेडमी कंपनीचा मोबाईल 2) वनप्लस कंपनीचा मोबाईल असे दोन फोन मिळून आले असता तपासकामी पंचनामा करून जप्त केले.

Back to top button
error: Content is protected !!