छत्रपती संभाजीनगर
Trending

तुमची मुलगी हिंन्दु मुलासोबत का फिरते म्हणून धमकावले ! दुचाकीवर पाठलाग करून काढलेला व्हिडीओ व्हायरल केला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – स्कुटीवर एका व्यक्तीसोबत बसलेल्या महिलेचा दुचाकीवरून पाठलाग केला. यादरम्यान व्हिडियो चित्रिकरणही केले. हा व्हिडियो व्हायरल करून बदनामी केली. याशिवाय मुलीच्या वडिलांना फोन करून तुमची मुलगी हिंन्दु मुलासोबत का फिरते म्हणून धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील सेव्हन हिल मार्ग गजानन मंदिर समोर मनपा शौचालयाजवळ घडली. यातील फिर्यादी गजानन मंदिर समोरील म.न.पा शौचालय येथे एका व्यक्तीसोबत जात असतांना मो.सा. क्रमांक MH-20-AQ-2478 यावर असणाऱ्या दोन जणांपैकी एकाने फिर्यादीचा स्कुटीवर बसून जात असतांनाचा व्हिडीओ काढला.

कैलास नगर पर्यंत पाठलाग करुन काढलेला व्हिडीओ व्हायरल करून अब्रुनुकसान करून बदनामी केली. महिला फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले तसेच फिर्यादीच्या वडीलांना फोन करुन त्यांना सुध्दा तुमची मुलगी एका हिंन्दु मुला सोबत का फिरते असे म्हणून शिवीगाळ करून धमकी दिली.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये मो.सा. क्रमांक MH-20-AQ-2478 वरील दोघां अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि राजश्री गणपतराव आडे करित आहेत.

Back to top button
error: Content is protected !!