छत्रपती संभाजीनगर
Trending

देवगिरी बँकेच्या सहकार्याने विद्यापीठात आठ दिवसांत उभारला २० लाख लिटर क्षमतेचा बंधारा, आ. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते लोकार्पण !

संभाजीनगर लाईव्ह, दि.२२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात देवगिरी बँकेच्या सहकार्याने आठ दिवसांत ’फेरोसिमेंट बंधारा’ उभारण्यात आला आहे. या बंधा-यात २० लाख लिटर पाणी साठवले जाणार असून सुमारे एक कोटी लिटर पाणी जमिनीत मुरणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात देवगिरी नागरी सहकारी बँक व जलदूत यांच्या सहका-याने दोन बंधारे उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते ३१ मे रोजी करण्यात आले. तर आ.हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दुस-या बंधा-याचे क्राँकिटीकरण, खोलीकरण मंगळवारी करण्यात आले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला.

यावेळी प्रकुलगुरु डॉ.शात शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, जलतज्ज्ञ सर्जेराव वाघ, प्राचार्य भारत खंदारे, देवगिरी बॅकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, ’सीईओ’प्रवीण नांदेडकर, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, डॉ.कैलास पाथ्रीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोरील पार्कींगच्या बाजुला तसेच विद्यार्थी विकास मंडळ इमारतीच्या बाजूला असे सहा लाख लिटर क्षमतेचे दोन बंधारे उभारण्यात आले आहेत.

’जलदूत’च्या वतीने यापूर्वी दोन बंधारे परिसरात उभारण्यात आले, अशी माहिती किशोर शितोळे यांनी प्रास्ताविकात दिली. या प्रसंगी बोलताना  हरिभाऊ बागडे यांनी देवगिरी बँकेशी बँकेच्या स्थापनेपासून असलेल्या जिव्हाळा अधोरेखित केला आणि बँकेच्या प्रगती बद्दल कौतुक केले. जलदुत किशोर शितोळे यांनी बंधाऱ्याची माहिती सांगितली- ६० फूट रुंदीचा, फेरोसिमेंट पद्धतीचा बंधारा हा बांधला असून, केवळ आठ दिवसांत बंधारा बांधून झाला आहे. यामध्ये २० लाख लिटर पाणी अडणार, एक कोटी लिटर पाणी जमिनीत जिरणार असेही ते म्हणाले. मनाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालकन तर प्रवीण नांदेडकर यांनी आभार मानले.

विद्यापीठाचे सेवकाच्या भुमिकेतून कार्य : कुलगुरु
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणा-या विद्यापीठात कुलगुरुपदी निवड होणे हा सर्वोच्च सन्मान आहे. विद्यापीठाचे सेवक म्हणून विद्यापीठ चालविणारे पदाधिकारी, अधिकारी यांनी काम करणे गरजेचे आहे. किशोर शितोळे यांनी सामाजिक दायीत्व निभवतांनच अत्यंत विनम्रतेने काम केले. मात्र आजकाल काही सदस्य आपण विद्यापीठाचे मालक असल्याप्रमोणे वागत आहेत, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!