महाराष्ट्र
Trending

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचे स्टेटस ठेवले म्हणून घरावर दगडफेक ! बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल !!

पोलिसांचे शांततेचे आवाहन, सिरसाळा पोलिस स्टेशनमध्ये जवळपास २० जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – राज्याच्या प्रस्तावानुसार केंद्राने नुकतेच औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले असून याचे सर्व स्तरातू स्वागत होत असताना काही मोजक्या लोकांकडून विरोधही होत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर व त्याखाली शिवाजी महाराज यांनी औरंगजेबचा कसा वध केला त्याच्या फोटोसह काही वाक्य ” बघ औरंग्या बघ तुला इथेच गाडला अन आज तुझ्या नावाचा अखेरचा शिक्काही बुडला ” असे स्टेटस ठेवल्याने २० जणांनी चक्क घरावर दगडफेक केली. ही घटना सिरसाळा (ता. परळी, जि. बीड) येथे रात्रीच्या सुमारास घडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले. बाकीचे १८ जण पसार झाले आहे. जवळपास २० जणांनी घरावर दगडफेक करून किचनमध्ये साहित्याची तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

रुपेश दगडु गायकवाड (वय 29 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. सिरसाळा ता. परळी जि. बीड) यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 03/03/2023 रोजी रात्री 09.01 वाजेच्या सुमारास आंबेडकर चौकातील वैजेनाथ लस्सी सेंटरवर बसलो होतो. त्यावेळी रुपेश दगडु गायकवाड यास त्याच्या एका मित्राच्या मोबाईलवर छत्रपती संभाजीनगर नावाचे स्टेटस दिसल्यांने त्याने ते लागलीच त्याच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून वॉटसअपमध्ये छत्रपती संभाजीनगर व त्याखाली शिवाजी महाराज यांनी औरंगजेबचा कसा वध केला त्याच्या फोटोसहीत काही वाक्य ” बघ औरंग्या बघ तुला इथेच गाडला अन आज तुझ्या नावाचा अखेरचा शिक्काही बुडला ” असे स्टेटस ठेवले होते.

लस्सी पिऊन झाल्यानंतर रुपेश दगडु गायकवाड हा घरी गेला. तो जेवण करून टि.व्ही. बघत होता. तेव्हा रात्री 10.52 वाजेच्या सुमारास घरी असताना रुपेश दगडु गायकवाड याच्या घरावर दगडफेक झाली. यात गॅलरीमधील घराला असलेल्या काचा फुटल्या. त्यावेळी रुपेश दगडु गायकवाड याने खिडकीतून पाहिले असता त्याला उमेर गल्ली आणि ईदगा चौकातील त्याच्या ओळखीचे व अनोळखीचे लोक घरावर दगडफेक करून शिवीगाळ करत असल्याचे दिसले.

ते रुपेश दगडु गायकवाड यास म्हणाले ” तू लय शिव भक्त झालास का…… ” तू बाहेर ये तुला जिवानिशी ठार करतो. त्यानंतर काही लोक रुपेश दगडु गायकवाड याच्या घरात घुसले. किचनमधील संसारउपयोगी साहित्याची त्यांनी तोडफोड केली. त्यानंतर खाली रुमध्ये असलेला रुपेश दगडु गायकवाड याचा भाऊ तात्याराव हा बाहेर आला असता त्याला लाथाबुक्यांने मारहाण केली.

आई जोरात ओरडल्यानंतर रुपेश दगडु गायकवाड हा त्याच्या वरच्या रुममधून खाली आला. तेव्हा रुपेश दगडु गायकवाड याने त्यांना ओळखले. दरम्यान, पोलिसांना ही माहिती समजताच त्यांनी अतिशय गांभीर्याने हे प्रकरण हाताळले. त्यांनी तातडीने रुपेश दगडु गायकवाड यास सिरसाळा पोलिस स्टेशनला घेऊन गेले. दरम्यान याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती असून बाकीचे पसार झाले आहेत. आज दिवसभर पोलिसांनी शांततेचे आवाहन केले.

याप्रकरणी रुपेश दगडु गायकवाड याने दिलेल्या तक्रारीवरून २० ते २२ जणांवर सिरसाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत असून त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!