महाराष्ट्र
Trending

जालना शहरातील महात्मा फुले मार्केटमधील खाद्यतेल व पानमसाल्याच्या दुकानाला भीषण आग !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- तेलाच्या आणि पानमटेरियलच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. धूराचे व आगिचे लोट दिसताच परिसरातील नागरिक धाऊन आले. त्यांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळ गाठले. त्यानंतर आगिवर नियंत्रण मिळवण्यात आले. जालना शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

आगिचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. जालना शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये अतुल चौडींये यांचे पानमटेरीयलचे व ओमप्रकाश नरवय्यै यांचे तेल विक्रीचे दुकान आहे. ही दोन्ही दुकाने आगिच्या विळख्यात सापडली. दुकानाच्या मागील बाजूने ही आग लागल्याने धूर आणि आगीचे लोळ दिसल्याने परिसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती.

शुक्रवारी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान खाद्यतेलाच्या व पानमटेरियलच्या दुकांनाना आग लागली. या आगीची झळ चौंडीये यांच्या गोदामालाही बसली. धुराचे आणि आगिचे लोट दिसताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग आजूबाजूला पसरू न देता त्यावर नियंत्रण मिळवले.

मात्र, या आगित खाद्यतेल दुकान व पानमटेरियलचे दुकान जळून खाक झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानमालकांनी दिली. अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, संतोष काळे, नितेश ढाकणे, रविनाथ बनसोडे, विठ्ठल कांबळे, सादत अली, किशोर सगट, विनायक चव्हाण यांनी आगिवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

दरम्यान, जालना शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील अंबुलवार, उपनिरीक्षक उद्धव चव्हाण, भगवान नरोडे, राजेंद्र वाघ, पोलीस कर्मचारी धनाजी कावळे, रामेश्वर जाधव, भरत ढाकणे, एस. जी. जाधव, भरत आगळे यांनीही परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

Back to top button
error: Content is protected !!