छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा विस्कळीत, पाच तास पाणी उचल बंद ! वारंवार खंडित वीज पुरवठ्यामुळे महावितरणने पळवले तोंडचे पाणी, शेवटी जालना फिडर आले मदतीला धावून !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – छत्रपती संभाजीनगर शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या ५६ व १०० दलली योजनेवरील जायकवाडी नवीन व जुने पंपगृहाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत करण्यात येणारा विद्युत पुरवठा दिनांक २७/०३/२०२३ रोजी सकाळी ६:४० वाजेपासून वारंवार खंडित होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांना संपर्क करून माहिती दिली असता त्यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर फिडरद्वारे करण्यात येणारा विद्युत पुरवठा चेंज ओव्हर करुन जालना फिडरवर करून देण्यात आला.

तदनंतर सकाळी ०७:४० वाजता म.रा.वि.वि. कंपनीकडून जालना फिडरचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु म.रा.वि.वि. कंपनीकडुन Phase Sequence Change झाल्यामुळे नवीन जायकवाडी पंपगृह येथील पंपींग चालु केली असता पंप क्र. ६ निखळला व पंप क्र. ५ जॅम झाला. यानंतर म.रा.वि. वि. कंपनीकडून Phase Sequence Change चे काम करण्यात आले व महानगरपालिकेमार्फत युद्धपातळीवर पंपगृहातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन सकाळी ११:३५ वाजता जुने जायकवाडी पंपगृहाची पंपींग व दुपारी १२:०५ वाजता नवीन पंपगृहाची पंपींग पुर्ववत यात आली.

परिणामी ५६ दलली योजनेवर ४ तास ५५ मिनीटे व १०० दलली योजनेवर ५ तास २५ मिनीटे खंडणकाळ झाला असल्याने सदर काळात पाणी उचल पूर्णत: बंद होती. या कारणामुळे शहराचा पाणी पुरवठा काही कालावधीसाठी विस्कळीत होणार आहे. शहरवासीयांना विनंती की, या दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!