छत्रपती संभाजीनगर
Trending

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यास विलंब ! छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची नजर चुकवून आत्महत्येचा प्रयत्न !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यास विलंब होत असल्याने एकाने डिझेलची बॉटल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय दुध डेअरी परिसरात हा प्रकार घडला. जमावबंदीचे आदेश असताना कोणतीही परवानगी न घेता निदर्शने आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

1) योगेश प्रल्हादराव खाडे, 2) रामदास बाबुराव वाघ, 3) शुभम गणपत बोंगाने (रा. जयभवानीनगर, 13 वी योजना, जागृत हनुमान मंदिराशेजारी, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात क्रांतीचौक पोलिस स्टेशनचे पोह भास्कर दामु नरवडे यांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दि. ३ जून रोजी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय दुध डेअरी येथे आरोपी विनापरवानगी जमा झाले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे शासकीय दुध डेअरी येथे स्मारक होण्यास वर्षानुवर्ष विलंब होत आहे म्हणून विना परवानगी शासकीय दुध डेअरी येथे जमा होऊन घोषणाबाजी केली. यामुळे पोलीस आयुक्त यांच्या आदेशाचे उल्लघन झाले. विना परवानगी निदर्शने करून घोषणाबाजी केली. पोलिसांची नजर चुकवुन प्लास्टीकच्या बॉटलमध्ये असलेले डिझेल सारखे द्रव्य अंगावर घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस स्टेशनचे पोह भास्कर दामु नरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) योगेश प्रल्हादराव खाडे, 2) रामदास बाबुराव वाघ, 3) शुभम गणपत बोंगाने (रा. जयभवानीनगर, 13 वी योजना, जागृत हनुमान मंदिराशेजारी, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह नागरे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!