छत्रपती संभाजीनगर
Trending

‘मार साले को अभी जिंदा नही रहेना चाहीये, बहुत मस्ती आ गयी’ ! स्कुटरमध्ये पेट्रोल भरण्यावरून शहागंजमध्ये चाकू हल्ला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – स्कुटरमध्ये पेट्रोल भरण्यावरून शहागंजमध्ये दोघांनी चाकू हल्ला केला. ही घटना दि. २ जून रोजी रात्री १०.३० वाजता शहकागंज येथील एसडी बाबा यांच्या भारत पेट्रोलीयम पंपावर घडली.

अफरोजखान फिरोजखान पठाण (वय 22 वर्षे, धंदा खाजगी नौकरी, रा.कासमंबरी दर्गा, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर हल्ला चढवणार्या दोन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, यातील आरोपी याने त्याच्या स्कुटरमध्ये पेट्रोल भरण्याच्या कारणावरून फिर्यादी अफरोजखान फिरोजखान पठाण यांच्या सोबत हुज्जत घातली. दोघां आरोपींनी फिर्यादी अफरोजखान फिरोजखान पठाण यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली व मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने फिर्यादी अफरोजखान फिरोजखान पठाण यांना धरून ठेवले व दुसर्या आरोपीने त्याच्या खिशातून चाकु काढला.

त्याचवेळी पहिला आरोपी म्हणाला की, मार साले को अभी जिंदा नही रहेना चाहीये. ईसको बहूत मस्ती आ गयी असे म्हणताच दुसर्या आरोपीने फिर्यादी अफरोजखान फिरोजखान पठाण  यांच्या पोटावर वार केला परंतू तो वार बरगडीवर लागला. त्याने परत फिर्यादी अफरोजखान फिरोजखान पठाण यांच्या डोक्यावर व अंगावर सपासप वार केले.

फिर्यादी अफरोजखान फिरोजखान पठाण यांच्या डोक्यात, पोटावर, कानावर मारून गंभीर जखमी केले. दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करून हाताचापटाने व चाकुने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रत्यन केला. याप्रकरणी अफरोजखान फिरोजखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्कुटर (क्र MH-03-DJ6890) चालकासह त्याच्या मित्रावर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि रोहीत गांगुर्डे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!