राजकारण
Trending

ज्यांनी उलथापालथ केली त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही: शरद पवार

कराड, दि. ३ – दुर्दैवाने आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याला फार अवकाश नाही. वर्षभराने पुन्हा लोकांसमोर जायची संधी येईल. त्यावेळी राज्यातील लोकशाहीच्या मार्गाला, शांततेवर विश्वास असणाऱ्या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला करूया. पुन्हा एकदा प्रगतीशील आणि सामान्य माणसाच्या हितासाठी कष्ट करणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य आपण निर्माण करूया, अशी हाक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसाला घातली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आज शरद पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावर येऊन चव्हाण साहेबांना अभिवादन केले. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, चव्हाण साहेबांचे वैशिष्ट्य होते की सामान्य माणसांचा अधिकार जतन केला पाहिजे. या राज्यात त्यांनी नवी पिढी तयार केली. जिल्ह्याजिल्ह्यात तरूणांचा संच उभा केला. या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीची अखंड काळजी घेतली. आज चव्हाण साहेब जरी आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेले विचार हे तुमच्या-माझ्या अंत:करणात आहेत. त्या विचाराने पुढे जाण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली.

आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्या न पिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैर भावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत, असेही पवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमार्फत राज्याची सेवा होत असताना ते सरकार या ना त्या पद्धतीने उलथून टाकण्याचे काम काही लोकांनी केले. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात झाले. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चव्हाण साहेब यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व जातीय आणि तत्सम विचारधारा आहेत, यातून देशाचा कारभार पुढे देण्याचा प्रयत्न होतोय.

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका याच प्रवृत्तींनी घेतली. दुर्दैवाने यात आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याला फार अवकाश नाही. वर्षभराने पुन्हा लोकांसमोर जायची संधी येईल. त्यावेळी राज्यातील लोकशाहीच्या मार्गाला, शांततेवर विश्वास असणाऱ्या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला करूया. पुन्हा एकदा प्रगतीशील आणि सामान्य माणसाच्या हितासाठी कष्ट करणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य आपण निर्माण करूया.

आज गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात जनमानस तयार करण्यासंबंधीचा निकाल काल आम्ही घेतला. याची सुरुवात करायची असेल तर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीशिवाय दुसरे स्थळ नाही. तुमचे, माझे, सगळ्यांचे गुरु, या पदावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला होता ती व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. त्यांच्या स्मृतिस्थळी याठिकाणी आपण प्रचंड संख्येने आलेत. या प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद देतो, असेही शरद पवार म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!