पोलिस अमलदाराने दीड हजाराची लाच मागितली ! कोर्टाला तामील रिपोर्ट सादर करण्यासाठी MIDC वाळूजच्या पोलिसाची डिमांड !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- कोर्टाला तामील रिपोर्ट सादर करण्यासाठी MIDC वाळूजच्या पोलिस अंमलदाराने दीड हजाराची लाच मागितली. संशय आल्याने लाच स्वीकारण्यास नकार दिला. याप्रकरणी सदर पोलिस अंमलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
संतोष गिरजाराम वाघ (वय 46 वर्षे, व्यवसाय नोकरी पद, पोलीस अमलदार, पोलीस स्टेशन MIDC वाळूज, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांनी चेक बाऊन्स प्रकरणी न्यायालयात कलम 138 नुसार दावा दाखल केलेला आहे. सदर दाव्यामध्ये न्यायालयाने काढलेले समन्स प्रतिवादी यांना तमील करून न्यायालयास तामिल रिपोर्ट सादर करण्यासाठी आरोपी पोलिस अंमलदार संतोष वाघ यांनी तक्रारदार यांचेकडे 2000 रुपयांची मागणी केली. यापूर्वीच 500 रुपये स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
आज दि.27/08/23 रोजी पंच साक्षीदार समक्ष प्रत्यक्ष तक्रारदार यांचेशी समन्स तामिल बाबत बोलणी करून 1500/- रुपये लाच मागणी केली. आरोपीला संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. आलोसे यास ताब्यात घेतले असून MIDC वाळूज पोलिस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – संतोष घोडके, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोहे कॉ रवींद्र काळे, पोलिस अंमलदर विलास चव्हाण , चा पो.शि. चांगदेव बागुल यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe