छत्रपती संभाजीनगर
Trending

सन्मित्र कॉलनीत व्यापाऱ्यास लुटणारे खोकडपुऱ्याचे तीन आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात ! चार लाख 37 हजार 200 रुपयांसह हमाल आणि मेडिकल डिलिव्हरी बॉयच्या अशा आवळल्या मुसक्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- सन्मित्र कॉलनीत व्यापाऱ्यास लुटणारे खोकडपुऱ्याचे तीन आरोपी गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून चार लाख 37 हजार 200 रुपये रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला. 1) शेख सोहेल शेख रईस (वय 26 वर्षे, धंदा मेडिकल एजन्सीवर डिलेव्हरी बॉय, रा. गुलशन मस्जिद जवळ, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर), शेख सोफियान शेख मोईन (वय 20 वर्षे, धंदा मजुरी, रा. गुलशन मस्जिद जवळ, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर), शेख नासेर शेख ताहेर (वय 22 वर्षे, धंदा हमाल, रा, ऊंट मोहल्ला, शमा हॉस्पिटल जवळ, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक 07/07/2023 रोजी पोलिस ठाणे क्रांतीचौक येथे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना सन्मित्र कॉलनी येथे फिर्यादी निर्मल कोटक यांच्या हातातील पैशाची बॅग तीन अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून मोटरसायकलवर पळून गेले. या मिळालेल्या प्राथमिक माहिती वरून सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघड करण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी निर्देश देवून पथकाची स्थापना केली. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे सपोनि काशिनाथ महांडुळे व पोउपनि अजित दगडखैर यांचे पथक यांना नेमून घटना घडल्यापासून ते पूर्वीचे सिसिटीव्ही बारकाईने तपासण्याचे व बातमीदारांचे जाळे नेमून गुन्हा उघड करण्याचे निर्देश दिले होते.

सदरच्या पथकाला दिनांक 10/07/2023 रोजी गुन्हा घडल्यापासून तपासलेल्या साक्षीदार तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीवरून यातील संशयित आरोपी हे गुन्हा करण्यासाठी खोकडपुरा येथील काही इसमांना एकत्रित आणन्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी नकार दिला. तपास पथक खोकडपुरा परिसरात आले असता त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत संशयिताबाबत माहिती मिळाली.

त्यावरून संशयित 1) शेख सोहेल शेख रईस, वय 26 वर्षे, धंदा मेडीकल एजन्सीवर डिलेव्हरी बॉय, रा. गुलशन मस्जिद जवळ, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर 2) शेख सोफियान शेख मोईन, वय 20 वर्षे, धंदा मजुरी, रा. गुलशन मस्जिद जवळ, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर 3) शेख नासेर शेख ताहेर, वय 22 वर्षे, धंदा हमाल, रा, ऊंट मोहल्ला, शमा हॉस्पिटल जवळ, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली.

सुरवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांना पुढे अधिक विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. नेमलेल्या पथकाने तात्काळ गुन्हयात चोरलेली रक्कम शेख सोफियान शेख मोईन, वय 20 वर्षे, धंदा मजुरी, रा. गुलशन मस्जिद जवळ, खोकडपुरा याच्या राहत्या घरातून एकूण 4,37,200/- रोख व फिर्यादीची राखाडी रंगाची बॅग जप्त केली. पोलिस ठाणे क्रांतीचौकात दाखल गुन्हा उघडकीस आणून आरोपीतांना मुद्देमालासह पोलिस ठाणे क्रांतीचौक यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते, सहायक पोलीस आयुक्त,धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप गुरमे, सपोनि काशिनाथ महांडुळे, पोउपनि अजीत दगडखैर, पोहेकॉ गजानन मान्टे, पोना संजय नंद, पोना संदीप तायडे, पोना परभत म्हस्के, पोना विठ्ठल सुरे, पोअं राहुल खरात, पोअं सुनील बेलकर, पोअं संदीप राशिनकर, पोअं अमोल शिंदे, पोअं नितीन देशमुख, पोअं अजय दहिवाळ, मपोअं दीपाली सोनवणे, मपो अं अनिता त्रिभुवन, पोअं अजय चौधरी, चापोह ज्ञानेश्वर पवार सर्व नेमणुक गुन्हे शाखा यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!