छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

सोशल मीडियावरून ओळख करून व लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ! मिटमीट्यातील हॉटेल मेडॉजमधील प्रकार !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ –  सोशल मीडियावरून ओळख करून व लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेल मेडॉज व पीडितेच्या घरी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

राकेश बाबूलाल पांडे (वय-35 वर्षे, रा.राजा बाजार, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यातील आरोपीने फिर्यादी सोबत सोशल मीडियावरून ओळख करून फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून 01 ऑक्टोबर 2022 वेळ 00.00 पासून ते दिनांक 05/07/2024 वेळ 00.00 पर्यंत वेळोवेळी हॉटेल मेडॉज मिटमीटा छत्रपती संभाजीनगर येथे तसेच फिर्यादीच्या राहते घरी येऊन फिर्यादीच्या संमती शिवाय शारीरिक संबंध प्रस्थापित केले म्हणून गुन्हा दाखल.

याप्रकरणी 366/20 24 कलम 69,79, 351(2), 351 (3) नुसार छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि नरळे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!