छत्रपती संभाजीनगर

गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरले, एक ठार दुसरा गंभीर ! पोलिसांनी ८ तासांत हल्लेखोराच्या जटवाडा रोडवरून मुसक्या आवळल्या, आई-बापाला शिवीगाळ केली म्हणून गोळ्या घातल्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १०- पिस्टलने गोळीबार करून खून व गंभीर जखमी करणा-या आरोपीस गुन्हे शाखा व जिन्सी पोलिसांनी अवघ्या 8 तासांच्या आत अटक केली. जटवाडा रोडवर सापला रचून पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. गोळीबारात ठार झालेल्या युवकाने यापूर्वी आरोपीच्या घरी जावून त्याच्या आई वडीलास शिवीगाळ केली होती. त्याचा राग धरून त्यास गोळीबार करून ठार केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिकडच्या काळात छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात गोळीबाराच्या घटनांत वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

फय्याज बशीर पठाण (रा. गल्ली नंबर 21 बायजीपुरा छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गोळीबारात अल खुतुब हबीब हमद (वय 30 वर्ष रा. ग.नं. 16 इंदीरानगर, बायजीपुरा) याचा मृत्यू झाला व समीर बशीर पठाण (वय 30 वर्षे रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) हा गंभीर जखमी झालेला आहे.

दिनांक 09/08/2023 रोजी रात्री 07.45 वाजेच्या सुमारास बायजीपुरा गल्ली नंबर 21 येथे अभिलेखावरील सराईत आरोपी फय्याज बशीर पठाण (रा. गल्ली नंबर 21 बायजीपुरा छत्रपती संभाजीनगर) याने गल्ली नंबर 21 बौध्द विहाराच्या समोरील मेडीकल दुकाना समोर, छत्रपती संभाजीनगर येथे 1) अल खुतुब हबीब हमद (वय 30 वर्ष रा. ग.नं. 16 इंदीरानगर, बायजीपुरा), 2 ) समीर बशीर पठाण (वय 30 वर्षे रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर त्याच्या जवळील पिस्टलने गोळीबार केला होता. सदर गोळीबार मध्ये अल खुतुब हबीब हमद (वय 30 वर्ष रा. ग.नं. 16 इंदीरानगर, बायजीपुरा) याचा मृत्यू झाला व समीर बशीर पठाण (वय 30 वर्षे रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) हा गंभीर जखमी झालेला आहे.

याप्रकरणी जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुरनं. 225/2023 कलम 302, 307 भादवी सह कलम 3,25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. घटनास्थळास गुन्हे शाखा व पो.स्टे जिन्सी येथील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट दिली असता घटनास्थळावरून आरोपी फय्याज बशीर पठाण (रा. गल्ली नंबर 21 बायजीपुरा छत्रपती संभाजीनगर) हा मोटार सायकल वरून पळून गेला असल्याचे समजल्याने त्याचा बायजीपुरा व शहरातील इतर ठिकाणी जावून शोध घेत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की तो जटवाडा रोडवरील जंहागीर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर भागात पोलिसांनी सापळा लावला.

संशयित आरोपी काही वेळात सदर ठिकाणी आला. पोलिसांनी ताब्यात घेवून त्यास सदर घटने बाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे सांगितले. त्यास सदर घटने बाबत अधिक विचारपुस केली असता यातील मृताने यापूर्वी आरोपीच्या घरी जावून त्याच्या आई वडीलास शिवीगाळ केली होती. त्याचा राग धरून त्यास गोळीबार करून ठार केल्याचे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी पो. स्टे जिन्सी येथे हजर केले असून सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक रामेशवर रेगे, पो. स्टे जिन्सी हे करीत आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 2 ) शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त सिडको, साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक रामेशवर रेगे पो. स्टे जिन्सी, पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, सपोनि सुधीर वाघ, सपोनि मनोज शिंदे, सपोनि काशिनाथ महांडुळे, पोउपनि अमोल म्हस्के, पोउपनि प्रविण वाघ, पोह/संदीप तायडे, पोना/संजयसिंग राजपुत, पोना / संजय नंद, पोअ/राहुल खरात, पोअ/राजाराम डाखुरे, पोह/ विजय निकम, पोअ/नितीन देशमुख, पोअ/धर्मराज गायकवाड, पोअ/परभत म्हस्के, पोअ/मंगेश हरणे, पोअ / विशाल पाटील, पोअ / धंनजय सानप, चापोह/तात्याराव शिनगारे, चापोअ/दत्ता दुबळकर तसेच पो.स्टे जिन्सीचे पोउपनि प्रविण पाथरकर, पोह/ शेख जफर, पोना/ बाशिद पटेल, पोना/ नंदलाल चव्हाण, पोअ / संतोष बमनावत, पोअ / संतोष शंकपाळ यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!