छत्रपती संभाजीनगर
Trending

केंद्रीय युवक महोत्सवाची तारीख जाहीर, विद्यापीठ कॅम्पसमध्ये ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान आयोजन

सहा गटात ३६ कलाप्रकार

संभाजीनगर लाईव्ह, दि.१० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव यंदाही विद्यापीठाच्या ’मुख्य कॅम्पस’मध्येच होण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान होणा-या या युवक महोत्सवात सहा गटांत ३६ कलाप्रकार सादर होणार आहेत.

या संदर्भात सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या उपस्थितीत सल्लागार समितीची बैठक घेऊन युवक महोत्सवाची पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.मुस्तजिब खान यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सल्लागार समितीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.योगिता होके पाटील, रंगभूमी अभ्यासक प्रा.संभाजी भोसले, डॉ.दासू वैद्य, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.जयंत शेवतेकर, डॉ.संजय पाटील देवळाणकर, डॉ.सोनाली क्षीरसागर आदींचा समावेश आहे.

विद्यापीठाच्या मुख्य परिसरात ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान महोत्सव घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यामध्ये नृत्य, नाटय, संगीत, वाड़ःमय, ललित कला व महाराष्ट्राच्या लोककला असे सहा विभाग असणार आहेत. यामध्ये ३६ कलाप्रकार असणार आहेत. संघाटत जास्तीत जास्त ३६ कलावंताचा सहभाग घेता येणार आहे. तसेच कलावंताचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आवश्यक असून एकला कलावंतास जास्तीत जास्त पाच कलाप्रकारात सहभागी होता येणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयीन येत्या ८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी विकास विभागाकडे हरिश्चंद्र साठे यांच्याकडे विद्यार्थी कलावंताच्या यादीसह आपली नावनोंदणी करावी, असे संचालक डॉ.मुस्तजिब खान यांनी कळविले आहे.

’मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव’मुळे तारखात बदल- हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुहे १७ सप्टेंबर दरम्यान महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच १४ सप्टेंबर रोजी बैलपोळा आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरला क्रीडा युवक महोत्सव घेण्याची सूचना मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केली. महोत्सवाच्या तयारीसाठी विविध समित्या गढीत करण्यात येणार आहेत.

महोत्सवात उत्तम सुविधा पुरविणार : कुलगुरु
युवक महोत्सवासाठी नाटयगृह, नाटयशास्त्र विभागासह एकुण सहा रंगमंच असणार आहेत. भोजन कक्षासह सर्वच ठिकाणी ’वॉटरफ्रुप’ मंडप उभारण्यात येणार आहेत. निवास व्यवस्था, भोजनाचा दर्जा व महोत्सव आयोजनाच्या ठिकाणी मंडप, साऊंड व्यवस्था अगदी सर्वच ठिकाणी उत्तम सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!