छत्रपती संभाजीनगर
Trending

हातपाय बांधून तोंडाला चिकट टेप आवळून महिलेचा खून ! छत्रपती संभाजीनगरमधील शारदाश्रम कॉलनी हादरली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५- हातपाय बांधून तोंडाला चिकटटेप आवळून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधील शारदाश्रम कॉलनी घडली. हॉलमध्ये काचेच्या बांगड्या फुटलेल्या व कानातील श्रवण यंत्र पडलेले होते. मृत महिलेच्या मावस भावाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मारेकर्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलका गोपालकृष्ण तळणीकर (रा. शारदाश्रम कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे.  विशाल विनयकुमार पांडे (वय 56 वर्षे व्यवसाय व्यापार रा. जिल्हा परिषद समोर, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्यांची मावस बहीण अलका तळणीकर हिचा मानलेला मुलगा अजिक्य अनिल तळणीकर यांच्यासह शारदाश्रम कॉलनी प्लॉट क्र. 21वर राहतात.

दिनांक 04/10/2023 रोजी रात्री अंदाजे 11.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी विशाल पांडे हे त्यांच्या घरी असताना शारदाश्रम कॉलनीत मावस बहीण अलका गोपालकृष्ण तळणीकर हिच्या घरी असलेले माऊली भोज या मेसचे चालक यांनी फिर्यादी पांडे यांना फोनद्वारे कळवीले की, अलका तळणीकर यांचे हातपाय बांधलेले आहेत. तुम्ही तात्काळ या असे कळवल्यावरून फिर्यादी विशाल पांडे हे तात्काळ शारदाश्रम कॉलनीत पोहोचले. मावस बहीणीच्या घरात गेले.

घरात प्रवेश केला असता हॉलमध्ये काचेच्या बांगड्या फुटलेल्या दिसल्या व कानातील श्रवण यंत्र पडलेले दिसले. घरातील पाठीमागच्या बेडरुममध्ये जावून पाहिले असता कॉटवर अलका तळणीकर यांचे हातपाय बांधलेले व तोंडाला चिकट टेप आवळलेले दिसले. त्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यावरून त्यांना पोलिसांच्या व नागरिकांच्या मदतीने घाटीत नेवून तपासणी केली असता डॉक्टरांनी अलका तळणीकर यांना मृत घोषित केले.

दिनांक 04/10/2023 रोजी रात्री 11.00 वाजेच्या सुमारास किंवा त्यापूर्वी अलका तळणीकर यांना अज्ञात मारेकर्याने हातपाय बांधून तोंडाला चिकट टेप आवळून अज्ञात कारणासाठी खून केला असल्याचे फिर्यादी विशाल पांडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!