छत्रपती संभाजीनगर
Trending

धारदार शस्त्राने मारहाण करून खून, फ्लोटींग स्पिरीट हॉटेलच्या समोर हर्सूल टी पॉईंटजवळ डाव साधला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने अज्ञात मारेकर्याला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

दिनांक 04/10/2023 रोजी 21.00 वा. फ्लोटिंग स्पिरिट हॉटेल समोर हर्सूल टी पॉइंट जवळ, छत्रपती संभाजीनगर येथे ही घटना घडली. सुरेश हरिभाऊ जावळे (वय 40 वर्ष, रा. देहाडे नगर, अंबरहील, छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे.

सुरेश हरिभाऊ जावळे यास कोणीतरी अज्ञात मारेकर्याने अज्ञात कारणासाठी फ्लोटींग स्पीरीट हॉटेलच्या समोर हर्सूल टी पॉईन्टजवळ 21.00 वाजेच्या सुमारास कोणत्यातरी धारदार शस्त्राने मारहाण करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी राजू आसाराम प्रधान (वय 40 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. हर्ष नगर, लेबर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. व कलम – 218/2023 कलम 302 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि खिल्लारे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!