गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरमध्ये धुमाकूळ घालणारे गंगापूर तालुक्यातील मंगळसूत्र चोरटे गजाआड ! रांजनगांव, बजाजनगर, गंगापूरच्या चार सोनारांकडून चोरीचे सोने जप्त !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – मंगळसूत्र, जबरी चोरी करणारे दोघे जण गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहे. मंगळसूत्र जबरी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले असून 8,20,000/- रुपयांचा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अलिकडच्या काळात छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट झाले अन् दोन चोरट्यांना पकडले. हे चोरटे चोरीचे सोने रांजनगांव, बजाजनगर व गंगापूरच्या सोनारांना विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून सोने जप्त करण्यात आले आहे.

1) संतोष पांडुरंग इष्टके (वय 29 वर्षे, धंदा पाणीपुरी विक्री, मुळ रा. कायगांव, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. घर नंबर आर एल 50, राजेंद्र चोपडे यांचे घरात किरायाने, आम्रपाली बुद्ध विहाराचे जवळ, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर), 2) निखील बाबासाहेब कु-हे (वय 21 वर्षे, धंदा लॉण्ड्री दुकान, मुळ रा. मौजे राघु हिवरे, शनीशिंगनापूर जवळ, ता. पाथर्डी जि. अहमदनगर, ह.मु. भाऊसाहेब बचकुल यांच्या घरात किरायाने, कमलनगर, कमळापूर रांजनगांव, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसांपासून मंगळसूत्र जबरी चोरीच्या घटना घडत आहेत. सदर घडलेल्या घटनांचे विश्लेषन करून छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या मंगळसूत्र जबरी चोरीच्या ठिकाणाचा आभ्यास करूनः संपूर्ण शहरात सापळा लावला. सर्व घटना मधील कार्यपध्दती ही एक सारखीच असल्याचे व मंगळसूत्र जबरी चोरी करणारे चोरटे हे एकच असल्याचा कयास पोलिसांनी बांधला.

त्यावरून दिनांक 08/06/2023 रोजी ए एस क्लब ते नगर नाका रोडवर, छावणी उड्डान पुलावर दोन संशयित मोटार सायकलने शहरात येत असल्याचे दिसून आले. त्यांना थांबवून विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे 1) संतोष पांडुरंग इष्टके (वय 29 वर्षे, धंदा पाणीपुरी विक्री, मुळ रा. कायगांव, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. घर नंबर आर एल 50, राजेंद्र चोपडे यांचे घरात किरायाने, आम्रपाली बुद्ध विहाराचे जवळ, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर), 2) निखील बाबासाहेब कु-हे (वय 21 वर्षे, धंदा लॉण्ड्री दुकान, मुळ रा. मौजे राघु हिवरे, शनीशिंगनापूर जवळ, ता. पाथर्डी जि. अहमदनगर, ह.मु. भाऊसाहेब बचकुल यांच्या घरात किरायाने, कमलनगर, कमळापूर रांजनगांव, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.

त्यांची विचारपुस केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वसात घेवून विचारपुस केली असता त्यांनी मंगळसूत्र जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. 1) बाबुसेठ ज्वेलर्स, गंगापूर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर, 2) धुळदेव ज्वेलर्स, कमळापुर रोड, रांजनगांव, 3) कृष्णा ज्वेलर्स, गंगापूर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर 4) ओम ज्वेलर्स, बजाजनगर यांना सोने विक्री केले असल्याचे सांगितले. त्यावरुन चारही सोनाराकडून गुन्हयातील एकूण 10 मंगळसूत्र 10 तोळे 05 ग्रॅम 360 मिली वजनाचे, 6,30,000/- रुपये किमतीचे व एक बजाज पल्सर मोटार सायकल असा एकूण 8,20,000/- रुपये किमतीचा मुद्येमला जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे एम वाळुज येथील 03, सातारा येथील 03, क्रांतीचौक येथील 02, पुंडलीकनगर येथील 01 व छावणी येथील 01 या प्रमाणे एकूण 10 मंगळसूत्र जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते व सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे, सपोनि काशीनाथ महांडुळे, पोउपनि प्रविण वाघ, व पोलीस अंमलदार नवनाथ खांडेकर, योगेश नवसारे, विजय भानुसे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, अभ्वलिंग होनराव, राजेंद्र साळुंके, अमोल शिंदे, राहुल खरात, सुनील बेलकर, महिला अंमलदार दीपाली सोनवणे व गिता ढाकणे, चालक श्रेपोउपनि अजहर कुरेशी, ज्ञानेश्वर पवार सर्व नेमणुक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!