छत्रपती संभाजीनगरराजकारण
Trending

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत महाविकास आघाडीचा फुगा फुटला ! १५ जागांपैकी ११ जागांवर भाजपा शिवसेना शिंदे गटाचा झेंडा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ – छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फुगा फुटला. बाजार समितीच्या १५ जागांपैकी ११ जागाांवर भाजप- शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकला. तर एकहाती विजयाच्या बाता झोडणार्या महाविकास आघाडीला अवघ्या ४ जागांवर विजय मिळाला.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी जालना रोडवर गुलाल उधळत जल्लोष केला. अतिशय शांततेने ही निवडणूक पार पडली. कुठलाही गालबोट याला लागला नाही. यामुळे प्रशासनाचे कौतुक होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आम्रपाली काशीकर, गायके श्रीराम, यशवंत देवकर, डी. एच. चव्हाण आदींनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली.

विजयी उमेदवार
1) राधाकिसन देवराव पठाडे
2) श्रीराम भाऊसाहेब शेळके
3) गणेश सांडू दहीहंडे
4) भागचंद रुस्तुम ठोंबरे
5) अभिजीत भास्कर देशमुख
6) मुरलीधर पुंडलिक चौधरी

7) सुजाता मनोज गायके
8) जनाबाई ज्ञानेश्वर ठोंबरे
9) दत्ताभाऊ पांडुरंग ऊकर्डे
10) भागिनाथ रणुबा नवपुते
11) पूनमचंद सोनाजी बमणे

महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे ४ उमेदवार विजयी
1) जगन्नाथ वैजनाथ काळे
2) कैलास ज्ञानदेव ऊकर्डे
3) महेंद्र जनार्दन खोतकर
4) पठाण अब्दुल रहीम अब्दुल सलाम

व्यापारी मतदार संघ
निलेश शेट्टी
कन्हय्यालाल जैस्वाल

हमाल तोलारी
देविदास कीर्तिशाही

निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना किती मेते मिळाली घ्या जाणून (पुढील लिंकला क्लिक करा) – कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर

Back to top button
error: Content is protected !!