छत्रपती संभाजीनगर
Trending

दुधात भेसळ करणारांचे धाबे दणाणले; बुरशी लागलेले, अस्वच्छ जागी साठवलेले 1887 लिटर संशयित भेसळ युक्त दूध व 71 किलो दुग्धजन्य पदार्थ नष्ट !

दुध भेसळ प्रतिबंधक समितीने केली 40 ठिकाणी तपासणी

संभाजीनगर लाईव्ह, दि.21 – दुध भेसळ प्रतिबंधक समितीने दि.22 ऑगस्ट ते दि.13 सप्टेंबर या कालावधीत 40 ठिकाणी तपासणी करुन 246 नमुने घेतले. त्यात 1887 लिटर संशयित भेसळ युक्त दूध व 71 किलो दुग्धजन्य पदार्थ नष्ट करण्यात आले, असे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ मोरे यांनी कळविले आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यात दुधभेसळ प्रतिबंधक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे हे आहेत. तर अपर पोलीस अधीक्षक अजित मैत्रे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन (शहर) डी.व्ही.पाटील, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीमती मनिषा हराळ-मोरे, उपायुक्त जिल्हा पुशसंवर्धन अधिकारी झोड आदी या समितीचे सदस्य आहेत.

या समितीअंतर्गत गठीत पथकाने धडक मोहिमेअंतर्गत दि.22 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत शहरात व तालुक्यात सहकारी, खाजगी दुध उत्पादक संस्था, खाजगी दुध संकलन केंद्र, खाजगी दुध शितकरण केंद्र व दुध प्रक्रिया प्रकल्प, घाऊक व किरकोळ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते व स्विट मार्टस अशा एकूण 40 ठिकाणी पाहणी केली. त्यात दुधाच्या 246 नमुन्यांची भेसळ तपासणी करण्यात आली. या तपासणीत बुरशी लागलेले, अस्वच्छ जागी साठवणूक केलेले 1887 लिटर दुध नष्ट करण्यात आले. तर जिल्ह्यात 71 किलो दुग्धजन्य पदार्थ नष्ट करण्यात आले.

जिल्ह्यात व शहरात दुध भेसळ प्रतिबंधक समिती मार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत, खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र, व संस्था इ. ठिकाणी दुध भेसळ तपासणीसाठी धडक मोहिम सातत्याने राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेत, दुध संकलन व शितकरण केंद्र, खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व दुध प्रक्रिया प्रकल्प यांनी उच्च गुणप्रतिचे भेसळ विरहीत दुध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, विक्री वापरात येणारे वजन काटे, दुध गुणप्रत तपासणी संयत्रे, नियमीत प्रमाणित करुन अद्यावत करावे असे आवाहन जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष व सर्व समिती सदस्यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!