छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

रेणुका माता मंदिर परिसरात ३३ फोर व्हिलरवर कारवाईचा बडगा, डी मार्ट परिसरातील अतिक्रमण काढले !

संभाजीनगर लाईव्ह, दि.१० – हडको येथील रेणुका माता मंदिर एन ९ परिसरातील विविध अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. महानगरपालिका अतिक्रमण हटाव आणि सिडको वाहतूक शाखा विभागामार्फत आज नवरात्र दुर्गा उत्सव निमित्त हडको जळगाव रोड येथील रेणुका माता मंदिर परिसरात आज रस्त्यावरील अतिक्रमण मोहीमे मध्ये एकूण ३३ चार चाकी वाहनधारकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येऊन अंदाजे २० हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला.

नवरात्र दुर्गा उत्सव निमित्त रेणुका माता मंदिर परिसर येथे नागरिकांनी चारचाकी वाहनांचे रस्त्यावर अतिक्रमण केले होते. या व्यतिरिक्त हरित पट्ट्यामध्ये चार चाकी गाड्यांचे अतिक्रमण करून व्यवसाय सुरू होता. त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्यात आली. टीव्ही सेंटर ते डी मार्ट रोड या रस्त्यावर अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करून येथील रस्त्यावरचे चार शेड काढण्यात आले.

तसेच आंबेडकर नगर चौरस्त्यावरील एकूण चार टपऱ्या काढण्यात येऊन सदर ठिकाणचा चौरस्ता मोकळा करण्यात आला आहे. या आठवड्यात सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवात नागरिकांनी महापालिकेस आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे मनपा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

सदर कारवाई सिडको वाहतूक शाखा आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त अतिक्रम विभाग सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रमण विभाग प्रमुख सविता सोनवणे, सिडको वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक राजेश मयेकर ,पद निर्देशित अधिकारी अशोक गिरी, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद ,वाहतूक पोलीस कर्मचारी सोनवणे व इतर पथकातील सर्व कर्मचारी, मजुर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!