छत्रपती संभाजीनगर
Trending

जालन्याला जाण्यास पैसे नसल्याने त्याने चक्क ट्रॅक्टर चोरला, मुकुंदवाडी पोलिसांनी जालन्यातून केले जेरबंद !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १०- जालना जाण्यास पैसे नसल्याने चक्क ट्रॅकटर ट्रॉलीसह चोरी करून जाणाऱ्या चोरट्यास जालना येथे पोलीस ठाणे मुकुंदवाडी विशेष पथकाचे अधिकारी अमलदार यांनी जेरबंद केले. अरोपीच्या ताब्यातून ३,००,०००/- रु किमंतीचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केले.

दि. ०९/१०/२०२३ रोजी पोस्टे. मुकुंदवाडी गु.र.न. । ४४२ / २०२३ कलम ३७९ भा.द.वि. मधिल फिर्यादी रामनाथ तुकाराम राठोड (वय ५६ वर्ष धंदा मजुरी रा. गेट क्रं.५६ नालंदा शाळेजवळ मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की दि. ०७/१०/२०२३ रोजी सांयकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे त्यांचा ट्रॅक्टर क्रं. MH-२८२८ D-०५२९ असा ट्रॉलीसह विमानतळाच्या भिंतीलगत एका हॉटेलसमोर उभा केला होता.

तो ट्रॅकटर अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेला. या फिर्यादीवरून पोलीस ठाणे मुकुंदवाडी येथे गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी विशेष पथकाचे अधिकारी अंमलदार यांना ट्रॅकटरचा व आज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत सूचना दिल्या. त्यानुसार विशेष पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ट्रॅकटर चोरी करून  जाणाऱ्या चोराचा सायबर सेलच्या च्या मदतीने ट्रॅकटर चोरास ३,००,०००/- रु किं.च्या ट्रॅक्टर ट्रॉली सह जालना शहरात जावून अटक केली. राजेंद्र सखाराम बारबिंडे (वय ३३ वर्ष रा. बजरंगनगर चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नरसींग पवार करीत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त, मनोज लोहीया, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २, नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, उस्मानपुरा विभाग, मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. मुकुंदवाडी येथील स.पोनि समाधान वाटोर, विशेष पथकाचे पोलीस उप निरीक्षक झनकसींग घुनावत, सहाय्यक फौजदार नरसिंग पवार, पोह बाबासाहेब कांबळे, पोलीस नाईक सुखदेव जाधव, पोअं. अनिल थोरे, गणेश वाघ, समाधान काळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!