छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

आता झाडांना खिळे ठोकून जाहिरातीचा फलक लावल्यास गुन्हा दाखल होणार ! सात दिवसांत झाडांवर खिळे ठोकून लावलेल्या जाहिरीतीचे फलक काढण्याचे आदेश !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – यापुढे झाडांना खिळे ठोकून त्यावर जाहिरातीचा फलक लावल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय झाडांना खिळे ठोकून जाहिरातींचे फलक जर लावले असतील तर ते सात दिवसांच्या आत काढून घ्यावे, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने .प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. प्रकरणी प्रशासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, काही व्यवसायिक हे त्यांच्या व्यवसायाची जाहिरात व्हावी या हेतुने मुख्यत्वे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना खिळे ठोकून जाहिरात लावतात तसेच पोस्टर, भिंतीपत्रके इत्यादी जाहिराती चिकटवतात. यामुळे झाडांचे नुकसान होते.

झाडांना इजा पोहचते आणि शहर सौंदर्यीकरणात बाधा पोहचून विद्रपीकरण होते व पर्यावरणास धोका निर्माण होतो. याची प्रशासक जी श्रीकांत यांनी गंभीर दखल घेतली आहे. या अनुषंगाने शहरातील सर्व संबंधीतांना जाहीर आवाहन करण्यात येते की, ज्यांनी झाडांवर खिळे ठोकुन पोस्टर्स/भिंतीपत्रके व तत्सम साहित्य द्वारे जाहीरात लावली असल्यास सात दिवसांच्या आत काढून घ्यावेत. या कालावधीनंतर पर्यावरणास धोका पोहचविल्याने संबंधीता विरुद्ध प्रशासक यांच्या आदेशानुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!