महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे पाटलांची सरकारसोबतची चर्चा फिस्कटली ! सरसकट मराठ्यांना आरक्षणाचा उल्लेख जीआरमध्ये नसल्याने उद्यापासून सलाईनही काढणार, पाणीही पिणार नाही !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – मराठा आरक्षणासाठी गेल्या ३० ऑगस्टपासून सुरु असलेल्या उपोषणाची दखल राज्य सरकारने घेतली मात्र, जीआरमध्ये सरसकट मराठा असा उल्लेख नसल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि सरकारची चर्चा फिस्कटली. सरकार जोपर्यंत मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा स्पष्ट जीआर काढत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही. उलट उद्यापासून उपोषण आणखी तीव्र करण्याचा निर्धार जरांगे पाटलांनी केला असून डॉक्टरांचा कुठलाही उपचार स्वीकारणार नसून पाणीही पिणार नसल्याची घोषणा आज, ९ सप्टेंबर रोजी जरांगे पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटलांचे ३० ऑगस्टपासून उपोषण चालू आहे. शांततेच्या मार्गाने सुरु असलेले हे उपोषण मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मंडपात घुसून १ सप्टेंबर रोजी अमानुष लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ संपूर्ण मराठवाड्यात पडसाद उमटले. सराकारने आंदोलनकर्त्यांना लाडीगोडी लावण्यासाठी जालना जिल्ह्याच्या एसपींना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा केली.

दरम्यान, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन राज्यसरकारचे शिष्टमंडळ जालन्याच्या अंतरवाली सराटीच्या उपोषणस्थळी पोहोचले. आतापर्यंत तीन ते चार वेळा सरकारचे शिष्टमंडळ व मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. सरकारने घाईघाईने जीआरही काढला. मात्र, ज्याच्या वशांवळीत कुनबी असा उल्लेख असेल अशा मराठ्यांना कुनबीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील जीआर काढला. तो जीआर मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही.

सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा जीआर जोपर्यंत सरकार काढत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी ९ सप्टेंबर रोजी जाहीर केली. यामुळे जीआरमध्ये किरकोळ दुरुस्ती करून जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यास आलेल्या अर्जून खोतकर यांच्या शिष्टमंडळाला आल्या पावली परतावे लागले. मनोज जरांगे पाटलांनी सूचवलेली दुरुस्ती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याची घोषणाही अर्जून खोतकर यांनी ९ सप्टेंबर रोजी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलणाचा वणवा संपूर्ण राज्यात पेटलेला असल्याने राज्य सरकारला चांगलाच दरदरून घाम फुटला आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण या भूमीकेवर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण जरांगे पाटील यांनी स्वीकारले मात्र, मुंबईत माझे शिष्टमंडळ पुरावे घेवून सरकारसोबत चर्चा करील माझे उपोषण आहे तेथेच सुरु राहील अशी भूमीका मनोज जरांगे यांनी घेतली होती.

त्यानुसार मनोज जरांगे यांनी २० जणांचे शिष्टमंडळ ८ सप्टेंबर रोजी मुंबईत पाठवले. मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळासोबत सुमारे २ ते २.३० तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली. चर्चेअंती जीआरचा मसुदा तयार झाला. त्यानंतर सुधारीत जीआर काढला. तो जीआर घेऊन ९ सप्टेबर रोजी अर्जून खोतकर उपोषणस्थळी आले. मात्र, या जीआरमध्ये सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण असा उल्लेख नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी तो जीआर अमान्य असून सुधारीत जीआर सरकारने काढावा तोपर्यंत उपोषणातून माघार नाही, अशी भूमीका मांडली. १० सप्टेंबरपासून उपोषण आणखी तीव्र करणार असून डॉक्टरांचा उपचारही स्वीकारणार नसून पाणीही पिणार नसल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी आज, ९ सप्टेंबर रोजी केली.

Back to top button
error: Content is protected !!