छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

आयुक्त जी श्रीकांत यांच्या WhatsApp वर तक्रार धडकताच २४ तासांत कारवाईचा बडगा ! हर्सूल फुलेनगर भागातील अतिक्रमण हटवले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.१६ – प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या WhatsApp (व्हाट्सअप) वर आलेल्या तक्रारीनंतर अवघ्या २४ तासांत कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागा मार्फत हर्सूल फुलेनगर भागातील अतिक्रमण हटवण्यात आले.

हर्सूल भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या फुलेनगर या ठिकाणी महानगरपालिकेच्या बालवाडी लगत वीस बाय दहा या आकाराच्या जागेवर स्थानिक नागरिकांनी लोखंडी अँगल मध्ये पत्र्याचे शेड करून पाठीमागच्या भागात हिरवी जाळी बसवली होती. सदर अतिक्रमण बाबत प्रशासक यांच्या व्हाट्सअपवर तक्रार प्राप्त झाली होती.

प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम आणि पद निर्देशीत अधिकारी सविता सोनवणे यांनी सोमवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पाहणी करून संबंधित अतिक्रमण काढणे बाबत तोंडी सूचना दिल्या होत्या. तरी देखील अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढले नाही म्हणून आज या ठिकाणी कारवाई करण्यात आली व कारवाई मधील सर्व निष्काशीत साहित्य जप्त करण्यात आले.

यानंतर या पथकाने सिद्धार्थ नगर ते टीव्ही सेंटर जवळ एकूण पाच अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली तसेच या ठिकाणाहून एक पाणीपुरीची गाडी व दोन लोखंडी काउंटर जप्त करण्यात आले. या लोकांनाही वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या तरी देखील हे अतिक्रमण काढत नव्हते.

आज हे साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई उच्च न्यायालयाचे जनहीत याचिका 109 2015 अंतर्गत कारवाई सुरू आहे. ही कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त तथा पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे, अतिक्रमण बांधकाम निरीक्षक सय्यद जमशेद यांच्यासह पोलिस पथकाने केली.

Back to top button
error: Content is protected !!