छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

महापालिकेच्या तीन निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय ! कर्मचारी समाधान शिबिरात आयुक्तांचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील तीन निलंबित कर्मचार्यांना कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतला. कर्मचारी समाधान शिबिरात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

महानगरपालिकेच्या कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या जाणून घेण्यासाठी “कर्मचारी समाधान शिबीराचे” दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी आयोजन केले जाते. दिनांक ०७/०७/२०२३ रोजी दुपारी २ वाजता स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित शिबीरात एकूण २५ निवदेने प्राप्त झाले. तसेच ३ निलंबित कर्मचाऱ्यांचे कुटूंबियांसमक्ष समुपदेशन करून कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय आयुक्त जी.श्रीकांत यांनी घेतला.

तसेच यापूर्वी झालेल्या कर्मचारी समाधान शिबीरांमध्ये प्राप्त झालेल्या १४४ निवेदनांपैकी ७१ निवेदने निकाली काढलेली असून ७३ निवेदने कार्यवाही अंतर्गत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अभय प्रामाणिक (सामान्य प्रशासन) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!