छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर परिसरातील अतिक्रमण अखेर काढले ! वकीलाने पथकाशी हुज्जत घातल्याचा महानगरपालिकेचा आरोप !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज, २४ मार्च रोजी हडको, टीव्ही सेंटर व कॅनॉट परिसरात कारवाई करण्यात आली. दरम्यान, एका वकीलाने पथकासोबत अतिक्रमण काढण्यावरून हुज्जत घातल्याचा आरोप महानगरपालिकेने केला.

महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाने हडको टीव्ही सेंटर परिसरातील तीन रस्त्यावरचे शेड काढून दोन चार चाकी मोठ्या बसवर दंडात्मक कारवाई केली. एन ०९ बळीराम पाटील चौक येथे दोन मिनी बस फुटपाथ वर मागील दहा दिवसांपासून उभ्या होत्या. दररोज या गाड्यांचे फोटो काढून त्यांच्या मोबाईलवर सूचना दिल्या जात होत्या. तरी देखील हे वाहनचालक महापालिका प्रशासनाला जुमानत नसल्याने आज यांच्याविरुद्ध कारवाई करून रुपये आठ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.

यानंतर स्वामी विवेकानंद नगर गार्डन समोरील एन १३ परिसरात अतिक्रमण पथकाने या भागातील नागरिकांचे मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सूचना देऊन त्यांना अतिक्रमित जागेची मार्किंग करून देण्यात आली आहे. या अतिक्रमणामध्ये रसवंती गृह, पंक्चरचे दुकान, दहा बाय दहा बाय पंधराचे कंपाउंड वॉल तर लोखंडी जीने काढणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर सदर पथकाने महानगरपालिकेच्या मालकीच्या टीव्ही सेंटर मार्केट परिसरातील बाजूला ठेवण्यात आलेल्या दोन लोखंडी टपऱ्या जप्त करण्यात आल्या.

सदर अतिक्रमण काढताना एका वकीलाने पथकाशी हुज्जत घातली आणि माझ्या रस्त्यावरचे अतिक्रमण काढू नका असा आरोप मनपा पथकाने केला. दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले असता त्याच्या कुटुंबातील एका महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना नम्र विनंती केली होती आणि एक दिवसाच्या वेळ मागून घेतला होता तरी देखील अतिक्रमण न काढल्याने आज या टपऱ्या जप्त करण्यात आल्या, अशी माहिती मनपाने दिली.

नंतर काही स्थानिक नागरिकांनी शिषोदे पाटील हॉटेल स्वराज्याचे मालक यांची समजूत घातली व हे जे काम होते खूप छान काम करत आहे याला तुम्ही विरोध करू नका असा त्यांना सल्ला दिला यानंतर टीव्ही सेंटर ते श्रीकृष्ण नगर पूर्व बाजू रस्त्यावर असलेले शटर काढणे बाबत सूचना दिल्या आहेत. तसेच पुढे डी मार्ट रोडवरील अतिक्रमित हातगाड्या काढण्यात आले आहे.

कॅनॉट परिसरातील एकूण १३ हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या परिसरातील उद्यानाच्या बाजूला असलेला फुटपाथ मोकळा करण्यात आला. याठिकाणी असलेले सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी अतिक्रमण धारकांनी पथकाशी मोठ्या प्रमाणावर वाद घातला परंतु पथक प्रमुख वसंत भोये यांनी यास न जुमानता कारवाई सुरू ठेवली यामुळे फुटपाथ मोकळा झाला आहे.

ही कारवाई प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशक अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, नगररचना विभागाचे उप अभियंता बाळासाहेब शिरसाठ, पूजा भोगे, सिडकोचे उदय चौधरी,मिलन खिल्लारे अतिक्रमण बांधकाम निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे,पंडित गवळी, रवींद्र देसाई मनपाचे मजूर आणि विद्युत विभागाचे कर्मचारी यांच्या पथकाने सदर कारवाई केली अशी माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे.

Back to top button
error: Content is protected !!