छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

सिडको एन ४, एन ८, एन १० परिसरातील अतिक्रमणे काढली ! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाची कारवाई !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागा मार्फत आज सिडको एन ४ भागात कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एन ४ भागात एकूण १५ बाय १५ आकाराच्या चार दुकानांची अतिक्रमणे काढण्यात आली. ही चारही दुकाने सामाजिक अंतरामध्ये होती तसेच या भागातून ४ टपऱ्या काढण्यात आल्या. अन्य अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.

एन ०८ परिसर मुख्य रस्त्यालगत एकूण ०६ शेड काढून तीन दुकाने निष्कशीत करण्यात आली. यानंतर दुपारी एन १० पोलीस मेस पर्यंत चार दहा बाय दहा आकाराचे पत्र्याचे शेड काढण्यात आले. यामध्ये रस्त्यावर व रस्त्याच्या डिव्हायडर मध्ये चार चाकी वाहना विरुद्ध कारवाई करण्यात आली.

तसेच रस्त्यावरील बंद असलेली भंगार वाहने जप्त करण्यात आली. तर इतर वाहनांना वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी दंड आकारला. तसेच तीन लोखंडी टपऱ्या हटविण्यात आल्या तर एक जप्त करण्यात आली. चार थंड पेय सोडा गाडी व एक रसवंती हटविण्यात आली.

ही कारवाई प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद ,पंडित गवळी, रामेश्वर सुरासे, मझअर अली व पोलीस कर्मचारी यांनी कारवाई सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!