कन्नड
Trending

कन्नड तालुक्यातील गराडा व मेहगावचे सरपंच व चार गावच्या सदस्यांना समान मते ! तालुक्यातील विजयी सरपंचाची नावे घ्या जाणून !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – कन्नड तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्य व सरपंच पदाचा निकाल आज जाहीर झाला. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मतमोजणी करून घोषित करण्यात आला. विजयी उमेदवारांनी महाविद्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदोत्सव साजरा केला. पळशी खुर्द, गौरप्रिपी, खामगाव, वडनेर येथील सदस्यांना समान मते मिळाली तर गराडा व मेहगावच्या दोन सरपंचांना समान मते मिळाली. त्यामुळे येथे इश्वर चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित करण्यात आले. याशिवाय तालुक्यातील औराळी येथील सरपंच बिनविरोध आला. धिरज राजु राठोड या बारा वर्षीय मुलाच्या हस्ते काढण्यात आल्या

कन्नड तालुक्यातील गराडा व मेहगावच्या दोन सरपंच व पळशी खुर्द, गौरप्रिपी, खामगाव, वडनेर येथील चार सदस्य उमेदवारांना समान मते 

तालुक्यातील गराडा येथील पुजा सचिन राठोड याना व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांस ५४० इतकी सारखी मते पडली चिठ्ठी द्वारे पूजा राठोड यांचा विजय झाला तर मेहगाव येथील सरपंच पदाच्या कल्याणी नागेश कांदे,  रेखा गणेश बोंगाने यांना ५३९  सारखे मतदान झाले होते यात चिठ्ठीत रेखा गणेश बोंगाने यांचा विजय झाला.

पळशी खुर्द – सदस्य अंजना अर्जुन काळे, गौरप्रिपी – सदस्य अजबसिंग सुर्यवंशी, खामगाव – सदस्य अप्पासाहेब गायके, वडनेर – सदस्य छायाबाई चव्हाण, हे सर्व समान मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठी काढून विजयी झाले.

संगिता शिवाजी निकम, आमदाबाद – नरसिंह सिताराम सोनवणे, देवपुळ – लताबाई ज्ञानेश्वर ताठे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.

कन्नड तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीचे सरपंच – 

१)आडगाव (जे) सविता दादासाहेब शिंदे,

२आडगाव (पि) केंदाळे रिता जनार्दन

३) आमदाबाद – सोनवणे नरसिंग सिताराम

४) औराळी- संगीता शिवाजी निकम,

 ५)बहिरगाव – केशव कचरू शिरसे,-

६) भारंबा – शिंदे प्रवीण दामोदर  शिंदे-

 ७)भारंबा तांडा-  राठोड वंदना ज्ञानेश्वर,

 ८) भिलदरी –  कोठावळे शोभा ईश्वर

९)भोकनगाव -हिराबाई कडुबा घोरपडे

१०) ब्राह्मणी – पवार गौतम रंगनाथ,

११) चिंचखेडा खुर्द – कांताबाई नारायण सातदिवे,

 १२) दाभाडी – अकिलाबी मुक्तार शहा

 १३) दहिगाव- किशोर गोटीराम सुतके

१४) देवपूळ   -लताबाई ज्ञानेश्वर ताठे

१५) दिगाव (खेडी)- कविता पुंजाराम सुसुद्रे

१६) डोणगाव – भगवान आबाराव शेजवळ

१७) गराडा – पूजा सचिन राठोड (ईश्वर चिट्ठी)

१८) गौरप्रिपी –  मालनबाई रामसिंग सूर्यवंशी

१९) गव्हाली –  वर्षा रवींद्र काळे

२०) हरसवाडी – विजय गंगाराम चव्हाण

२१) हस्ता – आखाडे दीपक कैलास

२२) हिवरखेडा गौताळा – जाधव सुमनबाई प्रेमसिंग,

 २३) हिवरखेडा नांगरवाडी –  कांताबाई काकासाहेब मगर २४) जळगाव घाट –  मोरे सिंधू देविदास,

२५) जामडी जहागीर – खरात दिनकर यादवराव

२६( जामडी घाट  – रेणुकाबाई कैलास पवार

२७)  जवखेडा बुद्रुक –  प्रवीण रामराव हराळ

 २८) जवखेडा खुर्द – भडगे मिराबाई शिवाजी

२९)  खामगाव – देवेंद्र मच्छिंद्रनाथ गायके

३०) खातखेडा – रूपाली ज्ञानेश्वर पवार

३१)  कोळंबी –  उज्वला यशवंत जाधव

३२)  लोहगाव  – तडवी राजीयाबी अकबर

 ३३) माळेगाव ठोकळ –  सुगराबाई रोहिदास राठोड

३४)  मेहगाव – रेखा गणेश बोंगाने  (ईश्वर चिट्ठीने) ३५)मोहरा  – समाधान विठ्ठल गाडेकर

३६)  नाचनवेल – कासाबाई शिवाजी थोरात

३७) पळशी खू –  सिमा विनोद जाधव.

३८)  सारोळा – जंगले सविता जगन्नाथ

३९)  शेलगाव –  विलास सोनाजी मनगटे

४०)  शेरोडी-  चंद्रकलाबाई काकासाहेब बोरसे

४१)  शिवराई – अनिता संतोष मुठ्ठे

४२)  शिरजगाव –  सुनिता विजय चुगंडे

४३)  टाकळी बु-  बापूसाहेब भगवान शेळके

४४) तांदुळवाडी –  सायली सोमनाथ गोडसे

४५) विटखेडा –  संगीता लक्ष्मण सवाई

४६) वडगाव जा. सुरेखा संभाजी पाटील

४७)  वडनेर –  मूलचंद बुधा पवार

४८)  वासडी –  अनिता कचरू विभुते

 ४९) कुंजखेडा – आरिफ महेभुबखाँ पठाण

५०) रिठ्ठी – ताराबाई विश्वनाथ राठोड,

५१) टाकळी (ल) – सोनाली लव्हा पिंपळे,

Back to top button
error: Content is protected !!