छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूजमहानगरपालिका
Trending

मोफत आयुष्मान कार्ड माहिती आणि वितरण !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट्सिटी लाईटहाऊस तर्फे मोफत आयुष्मान कार्ड माहिती आणि वितरण करण्यात आले.

चिकलठाणा मुकुंदवाडी, येथील रहिवाशांना आयुष्मान कार्ड्सबद्दल शिक्षित करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचा कार्यक्रम आज 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 या वेळेत चिकलठाना, मुकुंदवाडी येथे आयोजित केला.

या कार्यक्रमात आयुष्मान कार्ड्सची सर्वसमावेशक माहिती, त्यांचे फायदे आणि अर्ज प्रक्रिया यावर सविस्तर माहिती दिली गेली. उपस्थितांना त्यांच्या आयुष्मान कार्ड्स थेट प्राप्त करून दिले.

या उपक्रमामुळे रहिवाशांना मोफत आरोग्य कार्ड मिळवण्याची आणि आयुष्मान योजना याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी झाली.

या उपक्रमामध्ये लाईटहाऊस १५० व्यक्तींपर्यंत पोहचले आणि ८० व्यक्तींना प्रत्यक्ष आयुष्मान कार्ड्स वाटप करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!