छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

विशेष स्वच्छता अभियानात सहभाग न नोंदवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती पाठवण्याचे आदेश जारी ! संजयनगर, मुकुंदवाडीत आयुक्त जी श्रीकांत यांनी केले प्रबोधन !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणे, प्लॉस्टीक बंदी बाबत जनजागृती करणे या मोहिमे दरम्यान निघणाऱ्या कचऱ्याची नोंद ठेवणे. दैनंदिन कचरा संकलन करणे बाबत आढावा घेणे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल न चुकता घनकचरा व्यवस्थापन विभागात जमा करणे. तसेच अभियानात सहभाग न नोंदविण्याऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची माहिती पाठवणे. या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी कार्यालयीन आदेश जारी केला आहे.

प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दिनांक ०५/०७/२०२३ ते २०/०७/२०२३ पर्यंत दैनंदिन कामासोबत “हम होंगे कामयाब” या शिर्षा अंतर्गत “विशेष स्वच्छता अभियान” राबविण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज प्रशासक जी श्रीकांत यांनी संजयनगर मुकुंदवाडी येथे सकाळी भेट दिली. या ठिकाणी प्रशासक यांनी कचरा वर्गीकरण बाबत नागरिकांचे प्रबोधन केले. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून कचरा घंटागाडी मध्येच द्यावा असे ते म्हणाले. ओला सुका कचरा नाल्यामध्ये, ड्रेनेजमध्ये टाकू नका. त्यामुळे वारंवार ड्रेनेज चोकअप होते. असुविधा निर्माण होते. कचरा हा घंटागाडी मध्येच टाकावा, असे त्यांनी नागरिकांचे प्रबोधन केले.

या बाबत संजय नगर येथील ड्रेनेज चोकअप बाबत तक्रार प्राप्त झाली होती. तसेच विशेष स्वच्छता अभियानंतर्गत कामाचे वाटप करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी मुख्य रस्त्याची /खुला जागा/नियमित कचरा पडणारी ठिकाणे यांची पूर्णत: स्वच्छता करावी. उद्यान विभाग यांनी दुभाजकामधील/ फुटपाथ मधील नको असलेले झाडे/झुडपे निष्काशीत करणे. ड्रेनेज विभाग- मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करणे. यांत्रिकी विभाग- मुख्य रस्त्यावर जागोजागी पडून असलेले बांधकाम मलबा (C&D) उचलून घेणे. सदर अभियानामध्ये शहरातील सेवाभावी संस्था/बचतगट/स्वच्छता विषयक कामे करणारी मंडळे यांना सहभागी होण्यासाठी प्रशासकांनी आवाहन केले आहे. तसेच सदरील स्वच्छता अभियान खालील प्रमाणे प्रमुख मुद्देनिहाय व अनुषंगीक प्रबोधनव्दारे राबविण्यात येणार आहे.

नियमित कचरा पडणारी ठिकाणे शोधून कचरा उचलणे व सदरील GPV कचरा मुक्त करणे. रस्त्याच्या कडेला पडून असलेले डेब्रिज (C&D) यांत्रिकी विभागाच्या वाहनांद्वारे उचलणे, दुभाजका लगत असलेली माती काढून उचलून घेणे. नाल्याच्या बाजुला तसेच नाल्यामध्ये पडलेला कचरा उचलणे, सदरील मोहीमे दरम्यान वॉर्डामधील मोकळे मैदानांची स्वच्छता करणे, अनावश्यक झाडे झुडपे, गाजरगवत काढणे, दुभाजकांची स्वच्छता करणे.

ऐतिहासीक वास्तू/ महापुरुषांचे पुतळे/उद्यांनाची स्वच्छता करणे. एक दिवस निश्चित करून उड्डाणपुलावर आणि उड्डाणपुलाखाली मोहीम राबवून स्वच्छता करणे. मोहीमे दरम्यान निघणारा सुका कचरा हा पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या वाहनांमध्ये भरून पाठवावा व डेब्रिज (C&D,अनावशयक झाडे झुडपे, गाजरगवत हे यांत्रिकी विभागाच्या वाहनांद्वारे पाठवावे, असे प्रबोधन यावेळी करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!