छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

सिडकोतील सार्वजनिक बांधकाम विभाग निवासस्थान PWD कडून ११ लाख तर अन्न व औषधी विभागाकडून १९ लाखांची मालमत्ता कर वसुली !

२ नळ कनेक्शन तोडले तर १ मालमत्ता सील

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात थकीत कर वसुली मोहीम सुरु असून या मोहीमेदरम्यान आज सिडकोतील सार्वजनिक बांधकाम विभाग निवासस्थान (PWD) कडून ११ लाख तर अन्न व औषधी विभागाकडून १९ लाखांची मालमत्ता कर वसुली करण्यात आली. याशिवायही वसुली करण्यात आली असून २ नळ कनेक्शन तोडले तर एक मालमत्ता सील करण्यात आली.

प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके तर्फे शहरातील निवासी व व्यवसायिक मालमत्ता धारक यांच्याकडील थकीत मालमता कर व पाणी पट्टी बाबत सर्व ०९ झोन अंतर्गत सातत्याने कर वसुली व मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू आहे. उप आयुक्त तथा कर निर्धारक संकलक अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुख्यत्वे सहायक आयुक्त झोन ०५ सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एन ०५ सिडको येथील सार्वजनिक बांधकाम विभाग निवासस्थान यांच्या कडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी बाबत रु ११,६१,१३७/- धनादेश स्वरूपात वसूल करण्यात आले. यावेळी पथक प्रमुख अभिजित खरात,दत्ता खिल्लारे,अक्षय अंभोरे यांची उपस्थिती होती.

तसेच मा.सहायक आयुक्त संतोष टेंगळे झोन क्र ०८ यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड न १०६ कांचनवाडी – नक्षत्रवाडी येथील अन्न व औषधी विभाग कार्यालय कांचनवाडी यांचे कडील थकीत मालमत्ता कर बाबत रु १९,००,०००/- वसूल करण्यात आले. यावेळी अधीक्षक भारत बिऱ्हारे, कृष्णा दौंड,पथक प्रमुख सागर सोनवणे,शुभम खडके, संतोष मोरे आदींची उपस्थिती होती.

झोन ०५ अंतर्गत ०२नळ कनेक्शन तोडले
कर निर्धारक व संकलक यांच्या आदेशानुसार, सहायक आयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख विजय दाभाडे यांच्या उपस्थितीत सिडको एन ०८ येथील पंढरीनाथ जाधव यांचे कडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी रक्कम रु ०१,२२,४५१/ व नफिसा बेगम यांचे कडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी बाबत रक्कम रु.०१,१३,०६१ बाबत नळ कनेक्शन तोडण्यात आले. सदरील कार्यवाही राहुल पगडे, नागरी मित्र पथक कर्मचारी यांच्या पथकाने पार पाडली.

तसेच झोन क्र ०७ मा सहायक आयुक्त प्रसाद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड न ९८ गणेश कृपा अपार्टमेंट येथील गुप्ते यांचे कडील थकीत मालमत्ता कर रु.२८,५१४/-बाबत मालमत्ता सील करण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!