छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

मनपा प्रशासक, सीईओ जी श्रीकांत यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा घेतला वर्ग ! नाविन्यपूर्ण कल्पना वापरून प्रकल्पांचा दर्जा वाढवण्यासाठी 100 दिवसांचे टार्गेट !!

नवीनतम तंत्रज्ञानाच्या वापर करून स्मार्ट सिटी सार्थक करा: जी श्रीकांत

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ : रु 1000 कोटींच्या निधी मध्येच सिमित न राहता नवीनतम तंत्रज्ञानाच्या योग्य वापर करून उत्पन्नाचे स्त्रोत कसे वाढवता येईल आणि नागरिकांना उत्कृष्ट सेवा देता येईल ह्यावर उपाय करून मला 100 दिवसांत दाखवा असे आवाहन नुकत्याच रुजू झालेले मनपा आयुक्त व प्रशासक व स्मार्ट सिटी चे सीईओ जी श्रीकांत ह्यांनी मंगळवारी केले. ते स्मार्ट सिटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलत होते.

कमांड कंट्रोल रूम मध्ये तंत्रज्ञान वापरून राहणीमान उंचवायला हवं

स्मार्ट सिटी द्वारे राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात मनपा प्रशासक आणि नवीन सीईओ जी श्रीकांत ह्यांनी बैठक घेतली. स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, मुख्य लेखाधिकारी उत्तम चव्हाण, स्मार्ट सिटी बस चे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनिकर, विष्णू लोखंडे इ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या प्रकल्पाबाबत प्रशासकांनी सांगितले की देशामध्ये किंवा जगामध्ये विविध शहर कसे नवीनतम तंत्रज्ञानाच्या वापर करून नागरिकांसाठी सुविधा व सुरक्षा वाढवत आहे हे शिकून स्वतःचा कौशल्यात वाढ करा. उपलब्ध संसाधन वापरून मनपा व स्मार्ट सिटीचे उत्पन्न कसे वाढवता येतील ह्याच्यावर कार्य करावाच लागेल असे त्यांनी सांगितले.

स्मार्ट बसला दिल्ली मेट्रो आणि मुंबई लोकल सारखा लोकप्रिय बनवा

ब्रेकिंग न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर लाईव्ह गुगल अ‍ॅप इन्स्टॉल करा

प्रवाश्यांना बसेसच्या अचूक वेळ कळेल ह्यासाठी बस शेल्टर वर जी पी एस युक्त डिजिटल फलक लावण्यास आणि 100 दिवसांत उबर ओला सारख्या अचूक मोबाईल ॲप सिस्टीम स्मार्ट बस शी संगलनित करण्यास, नवीन सीईओ ह्यांनी बस विभागाला आदेशित केले. ह्यामुळे उत्पन्न दुपटीने वाढायला पाहिजे.

स्मार्ट स्कूल द्वारे शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे- स्मार्ट सिटी स्कूल प्रकल्पामध्ये छात्रांना उत्कृष्ट दर्ज्याचा शिक्षण मिळेल ह्यासाठी सॉफ्टवेअर तयार करून शिक्षण विभागाला उपलब्ध करून द्या. दिल्लीचा सरकारी शाळांसारखा स्मार्ट स्कूल चा दर्जा असावा.

त्यांनी मिटमिटा येथे तयार होत असलेल्या सफारी पार्क, जाधववाडी मंडी येथे उभारण्यात येत असलेल्या बस डेपो व अन्य प्रकल्पांना व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी विविध बाबी समजून घेतल्या व संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!