छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगर शहरात 5 प्रवेशद्वार निर्मितीचा प्रस्ताव ! मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, महापालिकेसह विविध विभागांचा आढावा !!

मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने आढावा

संभाजीनगर लाईव्ह, दि. 9 – मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने आज सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद, महानगरपालिकेसह विविध विभागाअंतर्गत विकास कामांचा आढावा व प्रस्तावासंदर्भात चर्चा यावेळी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, मनापा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासह जलसंधारण कृषी, शिक्षण ,सर्व विविध विभागाचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी, तसेच विविध विभागातील वेगवेगळ्या कामासाठीचे प्रस्ताव याबाबत आढावा पालकमंत्री यांनी घेतले. जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत शाळा खोल्या बांधकाम, कृषी, रस्तेविकास , पर्यटन वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही काही प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या.

शासकीय दंत महाविद्यालय, पर्यटन, पोलीस स्टेशनसाठी , पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी प्रस्ताव, महापालिकेचे भूमिगत गटार योजना, स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरात 5 प्रवेशद्वाराचे निर्मिती याबाबत मागणी प्रस्ताव, जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या बळकटी करणासाठी, क्रीडा विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रिंगरोड उड्डाणपूल,रस्ता अशा प्रस्तावांचा आढावा घेतला.

Back to top button
error: Content is protected !!