छत्रपती संभाजीनगर
Trending

पोलिस आयुक्तालयातील पोलिस हवालदार अपघातात जखमी, टी व्ही सेंटरकडून आलेल्या भरधाव गाडीने उडवले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – मारोतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे पायी निघालेल्या पोलिस हवालदाराला OLA च्या EV गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पोलिस हवालदार यांच्या डोक्याला, डाव्या हाताला व छातीला मार लागला. हा अपघात टी व्ही सेंटर परिसरात घडला.

हनुमान पुंजाराम जरारे (वय 54 वर्षे, रा. एन 10 सिडको पोलिस कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे अपघातात जखमी झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटल ICU मध्ये उपचार सुरु आहेत. जखमी पोलिस हवालदार जरारे यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 21/10/2023 रोजी 09.00 वाजेच्या सुमारास पोलिस हवालदार जरारे हे N-10 सिडको पोलीस कॉलनी येथून मारोतीचे दर्शन घेण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी पायी जात होते.

टि.व्ही सेंटर रोड कडून येणारी भरधाव OLA च्या EV गाडीने (क्र MH 20 GM 4757) पोलिस हवालदार जरारे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात पोलिस हवालदार जरारे यांच्या डोक्याला, डाव्या हाताला व छातीला मार लागला. रिक्षात घालून त्यांना उपचार कामी सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी पोलिस हवालदार हनुमान पुंजाराम जरारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून OLA च्या EV गाडी (क्र MH 20 GM 4757) चालकावर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!