Uncategorizedछत्रपती संभाजीनगर
Trending

किती ही दादागिरी ? पोलिस स्टेशनमध्येच पोलिसाच्या कानाखाली वाजवली ! मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये व्हिडियो शुटिंगवरून धक्काबुक्की, झटापट !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३- पोलिस स्टेशन आवारात आरडा ओरड सुरु असताना पोलिस निरीक्षकांनी संबंधीत आरडा ओरड करणार्यांना आपल्या कॅबिनमध्ये पोलिसांकरवी बोलावून घेतले. त्यांना समजावून सांगितले तरीही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांची व्हिडियो रेकॉर्डिंक करण्याचे फर्मान सोडताच प्रकरण इतके हाताबाहेर गेले की आरडो ओरड करणाऱ्या एका महिलेने महिला पोलिसाच्या कानाखाली वाजवली. त्या महिलेसोबत असणारी अन्य एक महिला व पुरुषानेही पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की, झटापट व शिवीगाळ केली. ही घटना २२ रोजी सायंकाळच्या सुमारास मुकुंदवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांचे कक्ष व पोलिस स्टेशनच्या आवारात घडली.

रमेश धनसिंग शिंगणे (वय ३१) अन्य दोन महिला (सर्व राहणार देवगिरी कॉलनी, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस कर्मचारी पुनम बच्छाव यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली की, पोलिस स्टेशनला सीसीटीएनएस ड्युटी कामी असताना पोलिस स्टेशनच्या आवारात आरोपी हे आरडाओरड करत होते. पो.नि. ससे यांनी आरोपीतांना त्यांच्या कक्षामध्ये बालावून आरोपी हे आरडाओरड करत असल्याने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचे फिर्यादी महिला पोलिस पुनम बच्छाव यांना सांगितले. त्यावरुन फिर्यादी महिला पोलिस या त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग करीत असताना नमुद आरोपी यांनी तुम्ही आमचे शुटिंग घेता का असे म्हणून शिवीगाळ सुरु केली.

यातील महिला आरोपीस फिर्यादी महिला पोलिस या समजवून सागत असताना फिर्यादीच्या कानाखाली मारून उजव्या हाताला चावा घेतला आणि आरोपी क्रमांक रमेश शिंगणे याने पोशि इंगळे यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांना कॅबिनमधून बाहेर घेवून येत असताना बाहेर उभी असलेली आरोपी महिलेने मपोअं बोर्डे यांच्याशी झटापट करुन उपस्थित असलेल्या स्टॉफला शिवीगाळ केली. याप्रकरणाचा पुढील तपास मुकुंदवाडी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान वाठोरे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!