छत्रपती संभाजीनगर
Trending

चितेपिंपळगाव बसस्टॅंडवर युवकावर चाकु हल्ला ! पोटावर वार केल्याने युवक जखमी !!

कॉलेज मधील पोरांना चहा का पाजतो म्हणून दुसर्या युवकावर हल्ला

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – भाच्यासाठी पाणीपुरी आणायास गेलेल्या युवकावर दोघांनी हल्ला चढवून जखमी केले. यातील एका आरोपीने पोटावर वार केल्याने युवक जखमी झाला. ही घटना चिकलठाणा पोलिस स्टेशनच्या हद्दीत चितेपिंपळगाव बसस्टँडवर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दुसर्या गटानेही परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. या घटनेत एकूण दोघे जखमी झाले.

विजय जगन्नाथ धुळे (वय 23 वर्षे व्यवसाय शेती रा. चितेपिंपळगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. वार्ड क्र 19 घाटीत त्याच्यावर उपचार सुरु असून त्याने दिलेल्या फिर्यादीवरून संकेत गावंडे व निलेश गावंडे यांच्यावर चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी विजय जगन्नाथ धुळे याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि 25/6/23 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास विजय जगन्नाथ धुळे हा दुचाकीने चितेपिंपळगाव बसस्टॅन्डवर भाच्यासाठी पाणीपुरी आणण्यासाठी गेला होता. तेथे संकेत गावंडे व त्यांचे चार पाच मित्र उभे होते. संकेत गावंडे यांनी शिवीगाळ सुरु केली. त्यावेळी विजय जगन्नाथ धुळे याने त्यांना शिव्या का देतो असे विचारले तेव्हा संकेत गावंडे यांनी फोन करून निलेश गावंडे यांना बोलावून घेतले.

तेथे निलेश गावंडे आले व त्यांनी चापटबुक्याने मारहाण सुरू केली. तेव्हा संकेतने त्याच्या सोबत आणलेला चाकू विजय जगन्नाथ धुळे याच्या पोटाच्या वर मारून शिवीगाळ करून तुला जीवे मारतो असे म्हणाला व चाकु मारून जखमी केले. चाकु हल्ल्यानंतर विजय जगन्नाथ धुळे हा खाली कोसळला असता संकेत व निलेश यांनी लाकडी दांड्याने व चापटबुक्याने मारहाण केली. त्यानंतर जखमी अवस्थेत विजय जगन्नाथ धुळे हा नातेवाईकाकडे गेला व घडला प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी व गावातील लोकांनी जखमी विजय जगन्नाथ धुळे यास घाटीत दाखल केले. याप्रकरणी जखमी विजय जगन्नाथ धुळे याने दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

हायवाच्या टायरखाली मारण्याची धमकी

दुसर्या घटनेतील जखमी युवकाचे नाव संकेत कल्याण गावंडे (वय 25वर्षे व्यवसाय शेती व शिक्षण रा. चितेपिंपळगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. संकेतने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून, दि 25/6/2023रोजी रात्री 10.00 वाजेच्या सुमारास संकेत कल्याण गावंडे हा चितेपिंपळगाव येथील बसस्टॉप जवळील श्री. हॉस्पिटल येथे बसलेला होता. गावातील विजय जगन्नाथ धुळे व त्याचा भाऊ राजेंद्र जगन्नाथ धुळे हे दोघेजण हॉस्पिटल जवळ आले. विजय संकेत कल्याण गावंडे यास म्हणाला की, कॉलेज मधील पोरांना चहा का पाजतो तुझी औकात आहे का, बसस्टॅन्डवर फिरतो बसस्टॅन्डवर दिसला तर तुझा गेम करून टाकीन असे म्हणून शिवीगाळ केली.

तुला हायवाच्या टायरखाली घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने त्याचे हातातील चाकू मारला. संकेत कल्याण गावंडे याच्या डाव्या हाताच्या करंगळीवर जखम झाली व रक्त निघु लागले त्यानंतर विजयने पोटात लाथ मारली व त्याचा भाऊ राजेंद्र जगन्नाथ धुळे याने बुक्का मारला. हे भांडण गावातील लोकांनी सोडवासोडव केली. त्यानंतर संकेत कल्याण गावंडे यास चुलत भाऊ निलेश गावंडे याने पोलीस स्टेशन चिकलठाणा येथे तक्रार देण्यासाठी घेवून आले.  याप्रकरणी संकेत कल्याण गावंडे याने दिलेल्या तक्रारीवरून1) विजय जगन्नाथ धुळे 2) राजेंद्र जगन्नाथ धुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!