संभाजीनगर लाईव्ह, दि. १३- वसंतराव नाईक कॉलेज ते नारेगाव दरम्यान 17 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. अलिकडच्या काळात मुलींच्या अपहरणाच्या घटनेत वाढ होत असल्याने पालकवर्गांत चिंतेचे वातावरण आहे.
विठ्ठल नगर, नारेगाव येथील अपहरण झालेल्या विद्यार्थिनीच्या आईने MIDC सिडको पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार 17 वर्षांची मुलगी वसंतराव नाईक महाविद्यालयात शिक्षण घेते. मुलगी सकाळी 09.00 वाजेच्या सुमारास कॉलेजला जावून साधारणपणे दुपारी 02.30 वाजेपर्यंत घरी परत येते.
दरम्यान, कॉलेजला गेलेली मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी शेजारी व आजुबाजुला राहणा-या लोकांना मुली बाबत विचारपुस केली. परंतू मुलगी दिसली नाही. नातेवाईकांकडेही शोध घेतला विचारपूस केली परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय बळावला.
याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून MIDC सिडको पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे. वसंतराव नाईक कॉलेज ते नारेगाव या दरम्यान अपहरण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe