छत्रपती संभाजीनगर
Trending

एकच जमीन तिघांना विकली: हर्सूल, पिसादेवी व छत्रपती संभाजीनगरातील तिघांची फसवणूक ! रजीस्ट्री कार्यालयाचाही भोंगळ कारभार, सिटी चौक पोलिसांत गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – एकच जमीन तिघांना विकल्याप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वेळा विक्री केलेल्या जमीनीचा व्यवहार हा रजिस्ट्री कार्यालयातून खरेदीखताद्वारे केल्याने पुन्हा एकदा रजीस्ट्री कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. फेर न झाल्याचा गैरफायदा उचलून संबंधीताने एकच जमीन तिघांना विकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष दत्तु पाटील (रा. एन-7 सी 2 सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

मुकुंद श्रीरंगराव जगदाळे (५१, रा. ब्ल्यू बेल्स सोसायटी, प्रोझोन मॉल शेजारी, एम आय डी सी, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्यांच्या ओळखीचे सुभाष दत्तु पाटील (रा. एन-7 सी 2 सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी त्यांच्या स्वतःचे मालकी व ताब्यातील मौजे मोरहिरा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी मौजे मोरहिरा येथील गट नं. 26 मधील त्यांच्या स्वत:च्या मालकी व ताब्यातील 0.40 आर व सामाईक क्षेत्रातील त्यांच्या हिश्याची 0.30 आर अशी एकूण 0.70 आर जमीन विक्री काढली होती.

सदर जमीन मुकुंद जगदाळे यांना पंसत आल्याने जमीन खरेदी करण्याचा सौदा एकूण 5,40,000/ रुपयांमध्ये ठरवला होता. त्यावरून दि. 18/12/2020 रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे खरेदीखत व्यवहार केला. सदर खरेदीखत करते वेळी लिहूण देणार सुभाष दत्तु पाटील यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे मोरहिरा गट नं. 26 मधील एकूण क्षेत्र 03 हेक्टर 25 आर पोटखराब 0.20 आर पैकी क्षेत्र 0.70 आर जमीन ही मुकुंद जगदाळे यांना दिनांक 18/12/2020 रोजीच्या नांदेणीकृत खरेदीखता अधारे 5.40,000/रुपयामध्ये कायमची विक्री केली होती.

सदर पैसे मुकुंद जगदाळे यांनी सुभाष पाटील यांना एस. बी. आय. बँकेच्या चेकने रुपये 4,40,000/ व 1,00,000/रुपये रोख असे दिले होते. सदर खरेदीखतानंतर सदर जमीनीचा ताबा मुकुंद जगदाळे यांना देण्यात आला होता. सदर जमीनीचा फेर घेणे बाकी होता. त्यामुळे सदर जमीन ही सुभाष दत्तु पाटील यांच्या नावावर 7/12 ( सातबारा) उताऱ्यावर नोदं होती. याच गोष्टीचा फायदा घेवून सुभाष पाटील यांनी मुकुंद जगदाळे यांना विक्री केलेली जमीनी पैकी 0.40 आर ही जमीन ही शिवाजी भाऊसाहेब औताडे (रा. हर्सूल) यांना दि. 12/08/2022 रोजी नोंदणीकृत खरेदीखताद्वारे विक्री केली.

तसेच पुन्हा तिच (0.40 आर जमीन ही प्रकाश सुखदेव पाटील (रा. राठी संसार, पिसादेवी रोड छत्रपती संभाजीनगर) यांना दि. 12/01/2023 रोजी नोंदणीकृत खरेदीखताद्वारे विक्री केल्याचे मुकुंद जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. मुकुंद जगदाळे यांच्या या फिर्यादीवरून सुभाष दत्तु पाटील (रा. एन-7 सी 2 सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!