देश\विदेश
Trending

राहुल गांधींची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाच्या तडकाफडकी कारवाईने राजकीय गोटात खळबळ !

राहुल गांधींना सुरत कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाची कारवाई

Story Highlights
  • सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे ? या वक्तव्याव्यर ठरवलं होतं सुरत कोर्टान दोषी

नवी दिल्ली, दि. २४ -: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला आहे. सन 2019 मध्ये मोदी आडनावाच्या विधानाबाबत खासदार राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरतच्या कोर्टाने काल दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सुनावल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे आज २४ मार्च रोजी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांना गुजरात राज्यातील सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात काल दोषी ठरवले होते. सन 2019 मध्ये मोदी आडनावाच्या विधानाबाबत खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात हा खटला सुरू होता. या खटल्यात राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. कोर्टाने राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर लगेच त्यांना जामीन मंजूर करत शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगितही दिली होती.

मानहानीच्या एका प्रकरणात काँग्रेस नेते तथा राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुजरात राज्यातील सुरत न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवले होते. सुरत न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला होता. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांची उदाहरणे देत सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे ? असा सवाल उपस्थित केला होता.

राहुल गांधी यांच्या या विधानावरून निवडणुकीदरम्यान चांगलाच गदारोळ झाला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात गुजरातचे भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. ज्यात राहुल गांधींना गुरुवारी सुरत कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. सुरत सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. १५ हजार रुपयांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने निकाल देतानाच खासदार राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला होता.

दोन वर्षांची शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद

दरम्यान, लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत भारतातील कोणत्याही खासदार किंवा आमदाराला कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे. ज्या अंतर्गत शुक्रवार, 24 मार्च रोजी राहुल गांधी यांचे संसदीय पद रद्द करण्यात आले. सुरत न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आज लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते येथून विजयी झाले होते. या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी मोदी आडनावावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यावर गुजरातच्या सुरत न्यायालयाने गुरुवारी त्याला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. आणि आज त्यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!