छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

राजा बिबट्याने घेतला अखेरचा श्वास ! आजाराविरोधातील दोन महिन्यांपासूनची झुंज संपली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.१७ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सिध्दार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील बिबट्या राजा (वय १५ वर्षे) याचा दि.१६.०८.२०२३ रोजी रात्री मृत्यू झाला. सदर बिबटा मागील दोन महिन्यांपासून आजारी होता. राजा बिबट्याला आमटेज् अॅनिमल आर्क्स, हेमलकसा गडचिरोली येथून २०१६ मध्ये प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते. त्यावेळेस त्याचे वय अंदाजे ७ ते ८ वर्षे इतके होते. त्याचा प्राणीसंग्रहालयामध्ये ७ वर्षे वावर होता.

आजारी राजावर प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांचेमार्फत प्रतिदिनी उपचार करण्यात येत होते. या बिबटाचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता अहवालानुसार आजारी बिबट्यावर उपचार करण्यात येत होते. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने दि.१६.०८.२०२३ रोजी रात्री राजाने अखेरचा श्वास घेतला.

या बिबट्याचे शवविच्छेदन आज दि. १७.०८.२०२३ रोजी सकाळी डॉ. अमीतकुमार दुबे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. रोहीत धुमाळ, व डॉ. महेश पवार पशुधन विकास अधिकारी, शासकीय पशुसर्व चिकीत्सालय, छत्रपती संभाजीनगर यांनी केले. मृत बिबट्याच्या शवाची विल्हेवाट लावण्याकरीता डी. बी. तौर वनपरिक्षेत्र अधिकारी व ए. डी. तांगड वन परिमंडल अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची उपस्थिती होती. यांचे समक्ष मृत बिबट्याचे शरीर जाळण्यात आले व घटनेचा पंचनामा करण्यात आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार बिबट्याचा मृत्यू Multi Organ failure ने झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती प्र. पशुवैद्यकीय अधिकारी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी दिली आहे.

Back to top button
error: Content is protected !!