महाराष्ट्र

देवगिरी, पनवेल आणि पुणे एक्स्प्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरुपात डब्यांची वाढ !

नांदेड, दि. १० – प्रवाशांची गर्दी लक्षात घेता देवगिरी, पनवेल आणि पुणे एक्स्प्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरुपात डब्यांची वाढ करण्यात आली आहे.

1. गाडी क्रमांक 17630 नांदेड ते पुणे एक्स्प्रेस मध्ये दिनांक 12 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर, 2023 दरम्यान एक वातानुकुलीत तृतीय श्रेणी चा डब्बा आणि एक स्लीपर क्लास चा डब्बा असे दोन डब्बे तात्पुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत.

2. गाडी क्रमांक 17629 पुणे ते नांदेड एक्स्प्रेसमध्ये दिनांक 13 ऑक्टोंबर ते 01 डिसेंबर, 2023 दरम्यान एक वातानुकुलीत तृतीय श्रेणीचा डब्बा आणि एक स्लीपर क्लासचा डब्बा असे दोन डब्बे तात्पुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत.

3. गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेसमध्ये दिनांक 14 ऑक्टोंबर ते 02 डिसेंबर, 2023 दरम्यान एक वातानुकुलीत तृतीय श्रेणीचा डब्बा आणि एक स्लीपर क्लासचा डब्बा असे दोन डब्बे तात्पुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत.

4. गाडी क्रमांक 17613 पनवेल ते नांदेड एक्स्प्रेसमध्ये दिनांक 15 ऑक्टोंबर ते 03 डिसेंबर, 2023 दरम्यान एक वातानुकुलीत तृतीय श्रेणीचा डब्बा आणि एक स्लीपर क्लास चा डब्बा असे दोन डब्बे तात्पुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत.

5. गाडी क्रमांक 17058 सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दिनांक 10 ऑक्टोंबर ते 02 डिसेंबर, 2023 दरम्यान एक वातानुकुलीत तृतीय श्रेणीचा डब्बा तात्पुरत्या स्वरुपात वाढविण्यात आला आहे.

6. गाडी क्रमांक 17057 मुंबई ते सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दिनांक 11 ऑक्टोंबर ते 03 डिसेंबर, 2023 दरम्यान एक वातानुकुलीत तृतीय श्रेणीचा डब्बा तात्पुरत्या स्वरुपात वाढविण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!