महाराष्ट्र
Trending

दिव्यांग राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुणे जिल्हा अव्वल, राज्यातून दोन हजार दिव्यांग विद्यार्थी दाखल !

पुणे :- दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेत पहिल्या दिवशी विविध खेळात उत्तम कामगिरी करुन पुणे जिल्ह्याने अव्वल क्रमांक तर नागपूर जिल्ह्याने द्वित्तीय क्रमांक पटकवला आहे.

पहिल्या दिवसाचे निकाल खालीलप्रमाणे

५० मीटर धावणे: कु.संध्याराणी विभिवा कदम (उस्मानाबाद)

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

१०० मीटर धावणे: कु. शिवशंकर जाधव (पुणे), कु. स्वप्निल चैतराम ढालखंडाइत व कु. श्वेता पिल्लेवान (नागपूर),

२०० मीटर धावणे: कु.दीप्ती दीपक तरणे (ठाणे)

४०० मीटर धावणे:  कु.जया यादव मंडले (लातूर)

पासिंग द बॉल: कु.आयुष वेताळ

उभे राहून लांब उडी: कु.गोपेश खोडवे (पुणे)  आणि कु.निकिता वाहिंदे, (नांदेड)

गोळा फेक: कु.दीप गोसाळकर व कु.ऋषिकेश कुरडकर (मुंबई उपनगर), कु.लक्ष्मी यशवंत वाघ, (सातारा), कु. अस्मिता प्रल्हाद देवकर (सांगली), कु.रवी कोंडीबा कवठे (लातूर) आणि कु. मोनो रंधारे  (अमरावती)

पोहणे: कु.कार्तिक धुपे, कु.आकाश खेडकर, कु. प्रवीण दांडगे, कु.रोहित निगडे आणि कु.सुहाना अन्सारी (पुणे), कु.शुभम खिखकर (औरंगाबाद), कु.वैभव टकले (अहमदनगर), कु.निखिल आगाशे (भंडारा), कु.प्रथमेश नीलम चंदन जळगाव), कु.हिमांशी पाटील (जळगाव), कु.विलास केळवदे (नागपूर), कु.नेहा कामठे (ठाणे) आणि कु.अर्जुन वरखेडे (नागपूर),

लांब उडी: कु.लक्ष्मी यशवंत वाघ (सातारा),

स्पॉट जम्प: कु.शुभांगी कोळी (सोलापूर), कु.रूपाली (उस्मानाबाद) आणि कु.प्रज्वल भोयर, (अमरावती).

सॉफ्ट बॉल थ्रो: कु.सागर उईके, (अमरावती)

दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातून दोन हजार दिव्यांग विद्यार्थी दाखल झाले आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे १४, १५ व १६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!