छत्रपती संभाजीनगर
Trending

औरंगाबाद: कॅनॉट प्लेसला ४ ते ५ जणांमध्ये फायटिंग, बॉन्सरनेही दिली झुंज ! पोलिस पोहोचताच ५ जणांचा घटनास्थळावरून काढता पाय !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – चार ते पाच जणांमध्ये राडा झाल्याची घटना कॅनॉट प्लेस येथे रात्रीच्या वेळी घडली. ही माहिती समजताच सिडको पोलिस स्टेशनचे पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिस त्यांना समजावून सांगत असतानाच आपसात भांडण करणार्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. यात एका बॉन्सरचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अंमलदार विशाल संजय खुटे (पोलीस ठाणे सिडको औरंगाबाद शहर) यांनी दिलेली माहिती अशी की, ते पो.स्टे सिडको येथे मागील नऊ महिन्यांपासून नेमणुकीस असून सध्या डायल 112 बीट मार्शल वर नोकरीस आहेत.

दि 15/02/2023 रोजी 21.00 ते दि 16/02/2023 चे 09.00 वाजेपर्यंत पोलिस अंमलदार विशाल संजय खुटे व सोबत पोअं वाघ पो. स्टे सिडको डायल 112 बीट मार्शल वर ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांना 21.30 वाजेच्या सुमारास कॉल आला की, कॅनॉट प्लेस एन 5 सिडको येथे रायगड शॉप हाउस समोर सार्वजनिक रोडवर काही जण आपसात भाडंत आहे.

या माहितीवरून पोलिस पथक लगेच कॅनॉट प्लेस एन 5 सिडको येथे पोहचले. त्या ठिकाणी चार ते पाच जण आपसात झुंज करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांची झुंज सोडवून त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याची नावे सचिन दिवे, शिवा काळे, आदर्श वैद्य व एक बॉन्सर असे सांगितले. त्याच्या सोबत इतर काही आपसात असे बाचाबाची करून झुंज करून सार्वजनिक शांतता बिघडवत असताना मिळून आले. पोलिस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना ते घटनास्थळावरून निघून गेले.

पोलिस अंमलदार विशाल संजय खुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन दिवे, शिवा काळे, आदर्श वैद्य व एक बॉन्सर यांच्यावर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!