डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नविन संचालक, विभागप्रमुखांची नियुक्ती !
औरंगाबाद, दि.३० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्र, विद्यार्थी विकास मंडळ संचालक व अर्थशास्त्र विभागप्रमुखपदी नविन नियुक्ती करण्यात आली तर तीन विभागप्रमुखांची फेरनियुक्ती करण्यात आली.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. मनुष्यबळ विकास केंद्राच्या संचालकपदी अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.धनश्री महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. तर या केंद्राचे संचालक डॉ.मुस्तजिब खान यांची विद्यार्थी विकास मंडळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
डॉ.संजय सांभाळकर यांच्याकडून शुक्रवारी (दि.३०) पदभार घेतला. तर डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी डॉ.सुनील नरवडे यांच्याकडून अर्थशास्त्र विभागाची सुत्रे स्वीकारली. या शिवाय डॉ.कल्पना झरीकर (शारिरीक शिक्षण विभाग) तसेच उस्मानाबाद उपपरिसरातील डॉ.नितीन पाटील (जल व भूमी व्यवस्थापन) व डॉ.जे.ए.कुलकर्णी (जैवतंत्रज्ञान विभाग) या तिघांची आगामी तीन वर्षांसाठी विभागप्रमुख म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली.
नूतन संचालक, विभागप्रमुखांचे प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी स्वागत केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe