छत्रपती संभाजीनगरदेश\विदेश
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ’युएस’कॉन्सलेटकडून कौतूक, शैक्षणिक व पर्यावरण अत्यंत उत्तम !

कुलगुरुंशी साधला संवाद

छत्रपती संभाजीनगर, दि.१८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण व संशोधनासाठी येणारे बहुतांशी विद्यार्थी पहिल्या पिढीचे पदवीधर आहेत. या विद्यापीठाचे ’शैक्षणिक व पर्यावरण’ अत्यंत उत्तम असल्याचे गौरवदगार ’युएस’ कॉन्सल्ट जनरल माईड हँकी यांनी केले.

’युएस कॉन्सलेट जनरल’च्या शिष्टमंडळाने मंगळवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास भेट दिली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या उपस्थित चर्चा करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद कक्षात मंगळवारी दि.१८ दुपारी ही बैठक झाली. यावेळी ’युएस कॉन्सलेट’चे अमरिता डिमोलो, आयशा खान, मनिष कंथारिया, इर्रा न बूरकी आदींची उपस्थिती होती.

तसेच प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.प्रशांत अमृतकर, फॉरेन स्टुडंस सेल संचालक डॉ.बीना सेंगर, ’इनोव्हेशन सेंटर’ संचालक डॉ.सचिन देशमुख, परीक्षा नियंत्रक संचालक डॉ.भारती गवळी, ’आयपीआय सेल’ संचालक डॉ.प्रवीण वक्ते, डॉ.मुस्तजिब खान यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

भारतीय विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशातील विद्यार्थी मोठया संख्येने येतात. देशात सर्वाधिक फेलोशिप प्राप्त विद्यार्थी संख्या आपल्या विद्यापीठात आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. यानंतर ’युएस कॉन्सलेट’ जनरल व सिफार्ट सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रारंभी कुलगुरु यांनी पाहुण्सांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या प्रगतीचे सादरीकरण डॉ.सचिन देशमुख यांनी केले. उभय संख्या कार्यबद्दलची माहिती यावेळी अदान-प्रदान करण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!