डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राची परीक्षा उद्यापासून ! तर निकाल घोषित होणार नाही !!
छत्रपती संभाजीनगर, दि.२७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राची परीक्षा मंगळवारपासून (दि.२८) सुरु होत आहे. चार जिल्हयातील २४६ केंद्रावर सदर परीक्षा होणार असून प्रथम वर्षांच्या १ लाख ११ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. बी.ए., बी.कॉम, व बी.एस्सी प्रथम वर्ष द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरु होत आहेत. २१ मार्चपासून बी.ए, बी.एस्सी व बी.कॉम या परापरागत अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरु आहेत.
तर निकाल घोषित होणार नाही
परीक्षा व मूल्यमापन विभागाच्यावतीने संलग्नित महाविद्यालयांसाइठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे, सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य / परिसंस्थांचे संचालक यांना कळविण्यात येते की, मार्च/एप्रिल २०२३ च्या पदवी प्रथम वर्ष व द्वितीय सत्राची परीक्षा दि.२८ पासून सुरु होणार आहे. त्यानूसार उपरोक्त पदवी प्रथम वर्ष द्वितीय सत्राचे परीक्षा आवेदन पत्र सव्र संबंधित महाविद्यालय/ परिसंस्थाच्या लाँगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत परंतु विद्यापीठाच्या असे निदर्शनास आले आहे की, अद्यापर्यंत अनेक महाविद्यालय/ परिसंस्थांनी परीक्षा आवेदन पत्र इनवर्ड केलेले नाहीत.
त्यामुळे या महाविद्यालय/परिनसंस्थांनी सव्र पदवी प्रथम वर्ष व द्वितीय सत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे परीक्षा आवेदन पत्र इनवर्ड केलेले नाहीत. अशा सर्व महाविद्यालय/ परिसस्थांनी शनिवारी दि.२५/०३/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत परीक्षा आवेदन पत्र इनवर्ड करून त्यांचे मेडेट जनरेट करावे. जनरेट झालेल्या मेडेट नुसार सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र महाविद्यालय / परिसंस्थेच्या लाँगीन मध्ये दि.२६ मार्च २०२३ रोजी पर्यंत उपलब्ध होतील.
जे महाविद्यालय / परिसंस्था उपरोक्त प्रमाणे परीक्षा आवेदन पत्र इनवर्ड करून मेडेटे जनरेट करतील. अशा सर्व महाविद्यालय / परिसंस्थांनी दि.०५/०४/२०२३ रोजीच्या आत जनरेट केलेल्या मेडेट नुसार परीक्षा शुल्क भरुन त्यांची माहिती प्रचलित पध्दतीनूसार समन्वय कक्ष, परीक्षा व मूल्यमापन विभाग, विद्यापीठ परिसर यांना दि.१०/०४/२०२३ रोजीच्या आत सादर करण्यात यावी. जे महाविद्यालय / परिसंस्था सदर तारखेनूसार कार्यवाही करणार नाही अशा सर्व महाविद्यालय / परिसंस्थांचे कोणत्याच अभ्यासक्रमांचे निकाल विद्यापीठामार्फत घोषित करण्यात येणार नाही, असेही संचालक डॉ.भारती गवळी यांनी कळवले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe